महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस ठाण्यातच पंचवीस हजारांची लाच घेणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जत पोलीस ठाण्यात सापळा रचून 25 हजार रुपयांची मागणी केलेली लाच घेताना रंगेहात पकडला आहे. ज्या पोलीस ठाण्यात कार्यरत होते, त्याच पोलीस ठाण्यामध्ये बागडी आणि कारंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली

पोलीस ठाण्यातच पंचवीस हजारांची लाच घेणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक
पोलीस ठाण्यातच पंचवीस हजारांची लाच घेणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक

By

Published : Jul 27, 2022, 10:38 PM IST

सांगली - पोलीस ठाण्यातचं 25 हजारांची लाच घेताना दोघा पोलिसांना बेड्या पडल्या आहेत. जत पोलीस ठाण्याचे कर्मचारी गणेश बागडी आणि संभाजी कारंडे या दोघांना अटक करण्यात आली आहे.एका अपघातातील मोटरसायकल सोडण्यासाठी तक्रारदारकडे दोघांनी लाच मागितली होती. त्यातील पंचवीस हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे.

25 हजार रुपयांची मागणी - जत पोलीस ठाण्याच्या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना लाच घेताना सांगलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.पोलीस नाईक गणेश बागडी आणि संभाजी कारंडे,असे या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. जर तेथील एका तक्रारदाराच्या भावाच्या गाडीचा अपघात झाला होता आणि त्याप्रमाणे जत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्यातील गाडी सोडण्यासाठी आणि गुन्हे कामी सहकार्य करण्यासाठी पोलीस कर्मचारी बागडी आणि कारंडे या दोघांनी तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपयांची मागणी केली होती,याबाबत तक्रारदारांनी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीची पडताळणी केली असता यामध्ये लाचेची मागणी करण्यात आल्याचे निष्पन्न झालं होतं.


दोघांनाही अटक - यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जत पोलीस ठाण्यात सापळा रचून 25 हजार रुपयांची मागणी केलेली लाच घेताना रंगेहात पकडला आहे. ज्या पोलीस ठाण्यात कार्यरत होते, त्याच पोलीस ठाण्यामध्ये बागडी आणि कारंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आल्याच्या घटनेमुळे सांगली पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details