महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bank Fraud News : मृत व्यक्तीचे 21 लाख हडपले; बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकासह दोघांना अटक

मयत व्यक्तिच्या नावाने बँकेत असणारी 21 लाखांची रक्कम परस्पर हडपल्या प्रकरणी (robbery of dead person money case) बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकासह दोघांना अटक (Two persons including the bank manager arrested) करण्यात आली आहे. रघुवीर रतन या व्यक्तीचा मृत्यू होण्यापूर्वी खात्यामध्ये त्यांची 21 लाख 28 हजार 364 इतकी रक्कम शिल्लक होती. मात्र दिनांक 11 मार्च 2018 रोजी त्यांचा मृत्यू झाला. रघुवीर रतन यांच्या मृत्यूचा फायदा उठवत त्यांच्या तीन खात्यातील असणारी रक्कम ही परस्पर अन्य खात्यात वर्ग करून काढून घेतले आहेत. (Bank Fraud News)

Bank Fraud News
महात्मा गांधी चौकी पोलीस ठाणे

By

Published : Dec 31, 2022, 7:34 PM IST

पोलीस निरीक्षक रविराज फडणीस माहिती देताना

सांगली : शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मयत व्यक्तिच्या नावाने बँकेत असणारी 21 लाखांची रक्कम परस्पर हडप केल्याचा प्रकार (robbery of dead person money case) मिरजेमध्ये घडला आहे. स्टेट बँकेच्या मिरज शाखेमध्ये हा प्रकार घडला असून याप्रकरणी तत्कालीन व्यवस्थापकासह दोघां विरोधात महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक करण्यात (bank manager arrested in Sangli ) आली आहे.(Bank Fraud News)

काय आहे प्रकरण : मिरजेच्या महात्मा गांधी चौकी पोलिसांच्याकडून मिळालेली अधिक माहिती याप्रमाणे मूळच्या बिहार येथील रघवीर कुमार रतन हे काही वर्षांपासून मिरजेच्या म्हाडा कॉलनी येथे राहत होते. त्यांनी आपल्या दैनंदिन आर्थिक कामांसाठी मिरजेतल्या स्टेट बँक या ठिकाणी आपलं खातं उघडलं होतं आणि त्या खात्यामध्ये त्यांची 21 लाख 28 हजार 364 इतकी रक्कम शिल्लक होती. मात्र दिनांक 11 मार्च 2018 रोजी त्यांचा मृत्यू झाला. स्टेट बँकेतील या खात्याबाबत आणि त्यामध्ये असणाऱ्या रकमेबाबत कुणालाही कल्पना नव्हती आणि नेमका याचाच फायदा उठवत बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक अनिल साळे व त्यांचे सहाय्यक अवधूत पाटील या दोघांनी रघुवीर रतन यांच्या मृत्यूचा फायदा उठवत त्यांच्या तीन खात्यातील असणारी रक्कम ही परस्पर अन्य खात्यात वर्ग करून काढून घेत हडप केले.

असे आले प्रकरण समोर : नुकतच बँकेचे सध्याचे व्यवस्थापक यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत तत्कालीन व्यवस्थापक अनिल साळे व त्यांचे सहाय्यक अवधूत पाटील या दोघांच्या विरोधात मयत व्यक्तीच्या नावे असणारे 21 लाख रुपयांची रक्कम परस्पर हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर महात्मा गांधी चौकी पोलिसांनी अनिल साळे आणि अवधूत पाटील यांना अटक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details