सांगली- मिरजेत धोकादायक इमारत हटवताना महापालिका सहाय्यक आयुक्तांसह, जेसीबी चालक व पालिका अधिकाऱ्यांना दोघांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तसेच, जेसीबीची तोडफोड केली. या प्रकरणी पालिकेने दोघांविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.
मिरजेत धोकादायक इमारत हटवताना सहाय्यक आयुक्तासह जेसीबी चालकास मारहाण - धक्काबुक्की
अमीर काझी व आलम काझी, अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता.
अमीर काझी व आलम काझी, अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता.
संततधार पावसामुळे महापालिका क्षेत्रातील इमारती धोकादायक बनल्या आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये, यासाठी या इमारती हटवण्याचे काम सुरू आहे. गुरूवारी मिरजेच्या रिगल हॉटेल चौक येथे धोकादायक इमारत जेसीबीने हटवण्याचे काम चालू होते. यावेळी घरमाल आणि पालिका अधिकाऱ्यांचा वाद झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या दोन तरुणांनी पालिकेचे अतिक्रमण अधिकारी यांच्यासह जेसीबी चालकाला मारहाण करत सहाय्यक आयुक्तांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला.