महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत दोन नवे कोरोनाबाधित आढळले, रुग्णांची संख्या २० वर - सांगली कोरोना अपडेट

सांगलीत नव्या दोन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. या नव्या रुग्णांसह जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० झाली आहे.

district
सांगलीत दोन नवे कोरोनाबाधित आढळले, रुग्णांची संख्या २०वर

By

Published : May 19, 2020, 9:39 AM IST

सांगली - जिल्ह्यात आणखी २ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दिल्लीवरून आलेल्या एक आणि मुंबईवरून कुंडलवाडी येथील कोरोनाबाधिताच्या संपर्कातील एक असे दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या २० वर पोहोचली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दिल्लीवरून 13 मे ला आलेल्या आटपाडी येथील 29 वर्षीय पुरुषाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिल्लीवरून आल्याने त्यांना आटपाडी येथे कम्युनिटी क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आले होते. रविवारी मिरज सिव्हिल येथे आयसोलेशन कक्षात दाखल करत स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. सदर व्यक्तीचा अहवाल सोमवारी रात्री उशीरा पॉझिटिव्ह आला आहे. तर या व्यक्तीची पत्नी व मुलगीही आयसोलेशन कक्षात असून त्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

मुंबईवरून कुंडलवाडी आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या एका नातेवाईकाला कोरोना लागण झाली आहे. सदर नातेवाईकास इस्लामपूर येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेला होता. या व्यक्तीचा इस्लामपूर येथे स्वॅब घेण्यात आला होता. सोमवारी रात्री त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details