सांगली- जिल्ह्यात मंगळवारी आणखी दोन नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा १२३ वर पोहोचला आहे. यातील ६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ५२ एवढी आहे. तासगाव आणि आटपाडी तालुक्यातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे ३ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णांलयामधून घरी पाठवण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी आणखी दोन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईहून तासगावमध्ये २२ मे रोजी आलेल्या एका कोरोनाबाधित तरुणाच्या ५८ वर्षीय आईला कोरोनाची लागण झाली आहे. तर आटपाडी तालुक्यातील झरे येथील ५७ वर्षीय महिला कोरोनाबाधित झाली आहे.
कोरोनावर उपचार घेत असलेले ३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील नागोळे येथील २२ वर्षीय तरुण, कडेगाव तालुक्यातील भिकवडी येथील ६५ वर्षीय व्यक्ती आणि वाळवा जांभूळवाडी येथील २६ वर्षीय महिलेचा समावेश आहे.