महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीमध्ये सोन्याच्या दुकानातुन तब्बल दोन किलो सोने कारागिराने पळवले - gold shop in sangali

सांगलीच्या सराफ बाजार येथे संतोष नार्वेकर यांच्या सोन्याच्या दुकानात पश्चिम बंगाल येथील गुलाम शेख हा कारागीर म्हणून गेल्या सात वर्षांपासून काम करत होता. प्रामाणिकपणे काम करत असल्याने मालकाने दुकानाच्या आणि कपाटाच्या चाव्या कारागीर शेख याच्याकडे दिल्या होत्या.

प्रतिकात्मक छाायाचित्र

By

Published : Sep 20, 2019, 5:51 PM IST

सांगली - सोन्याच्या दुकानातुन तब्बल सव्वा दोन किलो सोने दुकानातील कारागिराने पळवले आहे. सांगलीतील सोन्याच्या दुकानात हा प्रकार घडला. कारागीर हा पश्चिम बंगाल येथील असल्याचे समोर येत आहे. आरोपी विरोधात शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सांगलीमध्ये सोन्याच्या दुकानातुन तब्बल दोन किलो सोने कारागिराने पळवले

हेही वाचा - पुण्यातील २ भामट्यांनी लॉन व्यवसायिक प्राध्यापकाला घातला ९ लाखांचा गंडा

सांगलीच्या सराफ बाजार येथे संतोष नार्वेकर यांचे सराफी दुकान आहे. या दुकानात पश्चिम बंगाल येथील गुलाम शेख हा कारागीर म्हणून गेल्या सात वर्षांपासून काम करत होता. प्रामाणिकपणे काम करत असल्याने दुकानाचे मालक संतोष नार्वेकर यांच्या विश्वास शेखने संपादन केला होता. या दुकानाच्या आणि कपाटाच्या चाव्या कारागीर शेख याच्याकडे असायच्या आणि सोमवारी मध्यरात्री दुकानात कोणी नसल्याचे पाहून गुलाम शेख याने आपल्या कडील चाव्याने दुकानातील कपाट उघडून त्यातील ८४ लाख रुपये किमतीचे सव्वा दोन किलो सोने घेऊन पसार झाला.

हेही वाचा - औरंगाबादेत चाकूने भोसकून पतीची हत्या; पुरावे नष्ट करतानाच पोहचले पोलीस

मंगळवारी या ठिकाणी नार्वेकर यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर, त्याचा शोध सुरू करण्यात आला होता. आणि अखेर गुरुवारी रात्री नार्वेकर यांनी सोने चोरीप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुलाम शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार शेख त्याच्या मुळगाव असणाऱ्या पश्चिम बंगाल येथे गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक पश्चिम बंगालकडे जाण्याची तयारी करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details