सांगली - जिल्ह्यात शनिवारी कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ कायम असल्याचे दिसून आले.दिवसभरात तब्बल 252 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील 180 जणांचा समावेश आहे. 155 जण कोरोनामुक्त झाले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 2 हजार 374 ॲक्टिव्ह रुग्ण असून एकूण रुग्णसंख्या 4 हजार 448 झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी यामध्ये आणखी भर पडली. दिवसभरात उपचार घेणाऱ्या 9 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील 4, मिरज शहरातील 3 ,वाळवा तालुक्यातील बावची येथील 1 आणि कासेगाव येथील 1 व्यक्तीचा समावेश आहे.
दिवसभरात जिल्ह्यात तब्बल 252 नव्या रुग्णांची भर पडली आहे. ज्यामध्ये ग्रामीण भागापेक्षा सांगली महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या अधिक आहे. दिवसभरात सांगली महापालिका क्षेत्रातील तब्बल 180 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.ज्यामध्ये सांगली शहरातील 133 आणि मिरज शहरातील 47 जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्ण
१) आटपाडी तालुका -15
२) जत तालुका - 03
३) क.महांकाळ तालुका -07
४) मिरज तालुका -21