सांगली -गेल्या दोन वर्षांपासून मोक्काअंतर्गत गुन्ह्यात फरार असणाऱ्या दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. वैभव बाबर आणि रविराज जाधव अशी या दोघा आरोपींची नावे आहेत.
सांगली शहरातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात वैभव बाबर आणि रविराज जाधव या दोघांच्यावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अंतर्गत दोन वर्षापूर्वी गुन्हे दाखल झाले होते. या दोघांच्यावर विविध गुन्हे दाखल असल्याने मोक्का कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. मात्र, कारवाई झाल्यानंतर हे दोघे आरोपी पसार झाले होते. त्यानंतर पोलीस यांच्याकडून या दोघांचाही शोध सुरू होता.