सांगली -जिल्ह्यात आणखी दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. जत तालुक्यातील अंकली आणि सांगली शहरातील एक अशा दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे दोघेही मुंबईवरून सांगलीत दाखल झाले होते. त्यामुळे आता सांगलीतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 10 वर पोहोचला आहे.
सांगलीत आणखी दोन कोरोनाबाधित, मुंबईहून आलेले दोघेही पॉझिटिव्ह - सांगली कोरोना संचारबंदी
सांगलीतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 10 वर पोहोचला आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाचा धोका आता पुन्हा वाढत आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला आहे, तर सांगली शहरातही एक कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आली आहे. जतच्या अंकली याठिकाणी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सांगली शहरातील रेव्हेन्यू कॉलनी येथीलही एकाच अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सांगली शहरातील हा कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडला आहे. मात्र, तो मुख्य शहरात सापडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. हे दोन्ही रुग्ण मुंबईवरून आल्याची माहिती समोर आली आहे.
गुरुवारी आरोग्य प्रशासनाने त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने मिरजेच्या आयसोलेशन कक्षात दाखल करत त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती आणि शुक्रवारी दुपारनंतर या दोघांचेही अहवाल प्राप्त झाले असून ज्यामध्ये त्या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याची माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे. या दोघांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्टनंतर त्यानंतर प्रशासनाने त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी आणि शोध सुरू केले आहेत. सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढ सुरूच कोरोना रुग्णांचा आकडा आता 10 वर पोहोचला आहे.