महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जन्म आणि मृत्यू एकत्रच... जुळ्या भावंडांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू - Twin brothers death

सांगलीच्या बाळेवाडी येथे १० वर्षीय जुळ्या भांवडांचा नाल्याचा बांधात बुडून मृत्यू झाला आहे. लव आणि अंकुश अशी मृतांची नावे आहेत.

Twin brothers drown in nala dam At balewadi atpadi taluka
जन्म आणि मृत्यू एकत्रच... जुुळ्या भावंडांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

By

Published : Sep 12, 2020, 7:04 AM IST

सांगली - आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. नाल्याच्या बांधात बुडून १० वर्षीय सख्या जुळ्या भावंडांचा मृत्यू झाला आहे. दोघांनीही जन्मल्यानंतर एकाचवेळी पहिला श्‍वास घेतला होता. तसेच शेवटचा श्वास देखील एकाच वेळी घेतला. दरम्यान, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ईटीव्ही भारतला मिळालेल्या माहितीनुसार, लव कोळेकर आणि अंकुश कोळकर हे जुळे भाऊ मेंढ्या चारण्यासाठी बाळेवाडीच्या माळावर गेले होते. या माळावर जागोजागी माती नाला बांध आहेत. मागील आठवड्यात या परिसरात मोठा पाऊस झाला आहे. यामुळे सर्व बांध भरले आहे. मेंढ्या चरत आणि खेळत-खेळत तलावाच्या पाण्यात एक जण बुडाला. पाण्याचा अंदाज लागला नाही. पाय गाळात रुतत चालला. त्याला बाहेर काढण्यासाठी दुसरा गेला आणि बघता बघता दोघेही एकाच वेळी पाण्यात बुडाले.

पोहता येत नसल्यामुळे दोघांचाही दुर्दैवी अंत झाला. जन्माला एकत्र आलेल्या दोघांना काळाने एकाचवेळी ओढून नेले. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. साऱ्या गावाचे लक्ष वेधून घेणारी लव-अंकुश जोडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे साऱ्या गावावर मोठी शोककळा पसरली आहे.


हेही वाचा -इस्लामपूरमध्ये मुस्लीम समाजाच्या युवकांकडून हिंदू बांधवांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार

ABOUT THE AUTHOR

...view details