सांगली : शहरातील रेल्वे स्टेशन नजीक असणाऱ्या एका पाण्याच्या डबक्यात बुडून बारा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू ( Child Drowed in Sangli ) झाला आहे. अंश चव्हाण असे या मुलाचे नाव आहे. अंश हा सांगलीतील टिम्बर एरिया येथील नवीन वसाहत मधल्या गुरुद्वारा जवळ राहत होता.
Sangli Child Drowed : पाण्याच्या डबक्यात पोहताना बारा वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू..
शहरातील रेल्वे स्टेशन नजीक असणाऱ्या एका पाण्याच्या डबक्यात बुडून बारा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू ( Child Drowed in Sangli ) झाला आहे. अंश चव्हाण असे या मुलाचे नाव आहे. अंश हा सांगलीतील टिम्बर एरिया येथील नवीन वसाहत मधल्या गुरुद्वारा जवळ राहत होता.
12 वर्षाच्या बालकाचा मृत्यू - दुपारच्या सुमारास अंश आपल्या मित्रांच्या समवेत रेल्वे स्टेशन नजीक असणाऱ्या पाण्याच्या डबक्यामध्ये पोहण्यासाठी गेला होता. आणि यावेळी या पाण्यामध्ये पोहताना तो अचानक बुडू लागला. यावेळी तिथे असलेल्या त्याच्या मित्रांनी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर आसपासच्या नागरिकांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत तो पाण्यामध्ये बुडाला होता. त्यानंतर याची माहिती रेस्क्यू टीम आणि पोलिसांना देण्यात आली आणि रेस्क्यू टीम पोलिसांनी शोध मोहीम राबवून अंश याचा मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदन करण्यासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले.
पोहण्यासाठी गेला असताना मृत्यू -रेल्वे विभागाकडून या ठिकाणी मला मोठा खड्डा खोदण्यात आला होता, आणि खड्ड्यामध्ये पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी साचूत आहे. आणि याच खड्ड्या मध्ये पोहण्यासाठी गेला असता अंश याचा मृत्यू झाला आहे.