सांगली : पाडव्याच्या मुहूर्तावर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची आणि गुळाचे सौदे पार पडले ( Turmeric and Jaggery Deals in APMC ) आहेत. हळदीला 8 हजार 800 इतका उच्चांकी भाव तर गुळाला 4 हजार 211 इतका दर मिळाला आहे. मोठ्या उत्साहात सौद्यांचा शुभारंभ झाला. यावेळी व्यापारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Rajapuri Turmeric in APMC : पाडव्याच्या मुहूर्तावर हळद आणि गुळाचे सौदे; राजापूरी हळदीला उच्चांकी दर - Rajapuri Turmeric in APMC
पाडव्याच्या मुहूर्तावर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची आणि गुळाचे सौदे पार पडले ( Turmeric and Jaggery Deals in APMC ) आहेत. हळदीला 8 हजार 800 इतका उच्चांकी भाव तर गुळाला 4 हजार 211 इतका दर मिळाला आहे. मोठ्या उत्साहात सौद्यांचा शुभारंभ झाला. यावेळी व्यापारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हळदीची जागतिक बाजारपेठ :हळदीची जागतिक बाजारपेठ म्हणून सांगलीची ओळख आहे आणि हळदीचे वर्षातून दोन वेळा मुहूर्तावर सौदे पार पडतात. दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्तानेही हळदीचे सौदे करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे आणि चांगलेच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या उत्साहात पाडव्याच्या मुहूर्तावर हळद आणि गुळाचे सौदे पार पडले आहेत. जगभर प्रसिद्ध असणाऱ्या राजापुरी हळदीला उच्चांकी दर ( Rajapuri Turmeric highest price ) मिळाला. या सौद्यामध्ये 8 हजार 800 इतका दर मिळाला आहे . तर 6 हजार 600 इतका कमी दर मिळाला आहे. या सौदयाच्या निमित्ताने दिवसभरात 3 हजार पोत्यांची विक्री होईल,असा अंदाज व्यापाऱ्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
हळदीचे सौदे :शिल्लक असणाऱ्या हळदीचे सौदे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर काढण्याची परंपरा आहे. तर पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे देखील पार पडले आहेत. मोठ्या प्रमाणात सांगलीच्या बाजारपेठेत गुळाची आवक 12 महिने होत असते. त्यामुळे येथील गुळाला देखील मोठी मागणी असते आणि आज पार पडलेल्या या गोळ्यांच्या सौद्यामध्ये 4 हजार 211 इतका उच्चांक दर गुळाला मिळाला आहे.