महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

BJP Leader Gopichand Padalkar : ट्रक अंगावर घालून मला जीवे मारण्याचा प्रयत्न, जयंत पाटलांचा सहभाग असल्याचा आमदार पडळकरांचा आरोप - BJP Leader Gopichand Padalka

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी वैयक्तिक सुरक्षा रक्षक (बॉडीगार्ड) न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर महिन्यात आटपाडीत झालेली शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून झालेला हा हल्ला सुनियोजित कट होता असा दावाही पडळकर यांनी केला. गोपीचंद पडळकर यांनी पोलीस (BJP Leader Gopichand Padalka) प्रशासन आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर
भाजप आमदार गोपीचंद पडळकर

By

Published : Dec 26, 2021, 11:12 AM IST

Updated : Dec 26, 2021, 11:27 AM IST

सांगली - राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांनी कट करून माझ्यावर हल्ला केल्याचा गंभीर आरोप भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. (Padalkar's allegations against Jayant Patil) तसेच, या कटात पोलिसांचाच सहभाग असल्याने यापुढे आपण (Trying to Kill me with a Trucker) पोलिस बॉडीगार्ड घेणार नसल्याचे जाहीर करत पवार-पाटील विरोधात आपला लढा सुरूच राहील,असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आमदार पडळकर यांची प्रतिक्रिया
जयंत पाटील आणि पोलिसांनी रचला हल्ल्याचा कट

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या वादातून आटपाडी या ठिकाणी 7 नोव्हेंबर रोजी आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी, शिवसेना गटात जोरदार हमला झाला होता. यावेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह तीन गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह दोन्ही गटाच्या अकरा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह सांगली जिल्ह्याचे पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम आणि अपर पोलीस अधीक्षक मनीषा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सर्वांनी मिळून आपल्यावर हल्ला घडवून आणल्याचा आरोपही पडळकर यांनी केला आहे.

माझ्यावरचा हल्ला नियोजित

याबाबत पडळकर म्हणाले, माझी गाडी ज्या दिशेने येत होती. त्याच्या दुसऱ्या बाजूने दोनशे लोकांचा जमाव लाठ्या-काठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगडं फेकायची, मग माझ्या गाडीची स्पीड कमी होताच भरधाव वेगाने ट्रक अंगावर घालायचा. आणि मग जमावाकडून हमला करवून घ्यायचा असा सुनियोजित हा कट आखला होता. आणि आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व हल्ल्याचे लोक चित्रीकरण करताना पाहायला मिळले. त्यामुळे हा सगळा कट पोलीसांच्या संरक्षणात घडवून आणला गेला. सदर घटना थांबवण्यापेक्षा चित्रिकरणात सगळे मग्न होते असा आरोपही त्यांनी केला आहे.

यापुढे बॉडीगार्ड घेणार नाही

या हल्ल्याच्या कटात जिल्ह्याचे एस.पी दिक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालक मंत्री जयंत पाटील पुर्णपणे सामिल आहेत. यांनी या कारवाईच्या नावाखाली माझ्या बॅाडीगार्डलाच निलंबित केले आणि उलट माझ्यावरच ३०७ अंतर्गत गुन्हा दाखलं केला. त्यामुळे पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यावरील विश्वास उडाल्यामुळे मी बॅाडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. कारण रक्षकच जर भक्षकात सामील असतील, तर त्यांच्यावरती कसा विश्वास ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित करत, माझा पवार-पाटलां विरूद्धचा लढा चालूच राहील, असा इशारा पडळकर यांनी दिला आहे.

हेही वाचा -माहिंद्रा साहेब हवी तर तुम्हाला दुसरी गाडी देऊ! दत्तात्रय लोहार यांचा गाडी देण्यास नकार

Last Updated : Dec 26, 2021, 11:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details