सांगली - बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb purandare) यांना सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान(Shivpratishthan)च्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थ याठिकाणी आणलेल्या पुरंदरेंच्या अस्थी कलशाचे दर्शन घेण्यात आले. तर त्रिपुरा घटने(tripura violence)च्या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठानकडून आयोजित निषेध सभा मात्र पोलीस परवानगी नसल्याने रद्द करण्यात आली.
जमावबंदी आदेश
बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी पुणे या ठिकाणी निधन झाले. त्यानंतर त्यांचे अस्थिकलश सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून आणण्यात आला होता. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हे अस्थी कलश दर्शनासाठी ठेवण्यात आले. सांगली जिल्ह्यामध्ये त्रिपुरा घटनेच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू असल्याने मोजक्याच धारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पुरंदरेंच्या अस्थिकलशाचे दर्शन घेत शिवप्रतिष्ठानच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
भिडेंची सभा रद्द
त्रिपुरा (tripura violence) या ठिकाणी घडलेल्या घटनेनंतर राज्यात उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठानकडून संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या उपस्थितीत जाहीर निषेध सभा आज आयोजित करण्यात आली होती. मात्र सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लावल्याने प्रतिष्ठानकडून आयोजित निषेध सभेला परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर शिवप्रतिष्ठान(Shivpratishthan)कडून जाहीर सभा रद्द करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे सदस्य हणमंत पवार यांनी दिली आहे.