महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

26/11 हल्ल्यातील वीर जवानांना सांगली पोलिसांकडून वाहण्यात आली श्रद्धांजली

सांगलीत 26/11च्या मुंबई हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

By

Published : Nov 27, 2019, 9:11 AM IST

Tribute paid by the Sangli police
श्रद्धांजली वाहताना पोलिस कर्मचारी

सांगली- 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सांगली पोलिसांकडून अभिवादन करण्यात आले. जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या आणि पोलिसांच्या वतीने मेणबत्ती लावून वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

मुंबई येथे 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात महाराष्ट्र पोलीस दलातील जिगरबाज अधिकारी अशोक कामठे, हेमंत करकरे, विजय साळसकर यांसह अनेक पोलीस कर्मचारी आणि भारतीय सैन्य दलातील मेजर संदीप ऊन्नीकृष्णन यांच्यासह अनेकांना वीरगती प्राप्त झाली होती. या घटनेला काल (मंगळवार) 11 वर्ष पूर्ण झाले.

26/11 च्या या हल्ल्यात शहीद झालेल्या शहिदांना अभिवादन करण्यासाठी सांगली पोलिसांच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. सांगली-मिरज रस्त्यावरील पोलीस मुख्यालयासमोर असणाऱ्या शहीद अशोक कामटे चौकात यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांच्या उपस्थितीत मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनीही शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर यांचासह पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा - सांगलीच्या महिला बीएसएफ जवानाचा विजेच्या झटक्याने मृत्यू, आज अंत्यसंस्कार

ABOUT THE AUTHOR

...view details