सांगली- सांगली काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी १ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. त्यानुसार एक घर, एक झाड या अभियानाचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांच्याहस्ते रोप वाटप आणि लागवड करण्यात आली.
सांगलीत 'एक घर, एक झाड' उपक्रमाचा शुभारंभ; एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प - जिल्हाधिकारी
सांगली महापालिका क्षेत्रात पृथ्वीराज फाऊंडेशनकडून १ लाख वृक्षारोपण करण्यात येणार आहेत. त्यानुसार आज हरिपूर येथील बागेतील गणपती मंदिरातून या १ लाख वृक्षवाटप व लागवडीचा जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. त्यानिमित्ताने हरिपूर येथून वृक्षदिंडी काढण्यात आली.
सांगली काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या पृथ्वीराज फाऊंडेशनकडून सामाजिक संदेश देणारा वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सांगली महापालिका क्षेत्रात या फाऊंडेशनकडून १ लाख वृक्षारोपण करण्यात येणार आहेत. त्यानुसार आज हरिपूर येथील बागेतील गणपती मंदिरातून या १ लाख वृक्षवाटप व लागवडीचा जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. त्यानिमित्ताने हरिपूर येथून वृक्षदिंडी काढण्यात आली.
यावेळी पृथ्वीराज पाटील यांच्यासह सांगली महापालिकेतील नगरसेवक आणि फाऊंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिरवीगार निसर्गाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला. प्रत्येक सांगलीकरांपर्यंत वृक्ष पोहोचवण्याची मोहीम यशस्वीपणे राबवले जाईल, असा विश्वास यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केला.