सांगली - मिरज-पंढरपूर मार्गावरील भोसेनजीक महामार्गाच्या रस्त्याच्या कामाच्या निमित्ताने वटवृक्षाची कत्तल करण्यात येत आहे. याविरोधात सांगलीतील वृक्षप्रेमींनी एकत्र येऊन ४०० वर्षांच्या वृक्षाच्या संवर्धनासाठी चिपको आंदोलन करत चळवळ सुरू केली आहे.
सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-रत्नागिरी महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या रस्ते कामासाठी झाडांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात येत आहे. मात्र, मिरज-पंढरपूर मार्गावरील असणाऱ्या एका झाडाच्या कत्तलीवरून आता आंदोलन सुरू झाले आहे. भोसेनजिक असणाऱ्या यल्लमा देवीच्या मंदिरातील एक ४०० वर्षांपूर्वीचे जीर्ण आणि विस्तीर्ण असे वटवृक्ष तोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, सांगलीतील वृक्ष प्रेमींनी याला विरोध केला आहे. या वृक्षाचे संवर्धन करण्यासाठी एकजूट झाले आहेत. तसेच झाड वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. आज झाडाच्या ठिकाणी वृक्षप्रेमींनी एकत्र येऊन झाड वाचवण्यासाठी प्रतिकात्मक चिपको आंदोलन केले आहे. ४०० वर्षांचा हा ठेवा असून हे झाड तोडून टाकण्याऐवजी जोपासले पाहिजे. हे झाड तोडण्यापेक्षा त्याच्या बाजूने रस्ता काढणे हा पर्याय आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत झाड तोडू देणार नाही. यासाठी तीव्र जनआंदोलन छेडू, असा इशारा वृक्षप्रेमींनी दिला आहे. याठिकाणी असणाऱ्या यल्लमा मंदीर प्रशासनानेही झाडाचे जतन करण्यासाठी त्यांची जागा देण्यासाठी समंती दर्शवली आहे.
वारकऱ्यांच्या विसाव्याचे ठिकाण -