महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

History and Culture of Lord Ganesh 2022 सांगलीत चोर गणपती बाप्पा झाले विराजमान, दोनशे वर्षाची परंपरा - History and Culture of Lord Ganesh 2022

गणेशाच्या आगमनाला काही अवधी बाकी आहे. मात्र सांगलीत seated Sangli गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. चोर गणपती Thief Ganapati Bappa म्हणून संबोधल्या जाणाऱ्या गणेशाची, मानाच्या गणेश मंदिरात गणपती पंचायतन संस्थानकडून प्रतिष्ठापना झाली आहे. कोणताही गाजावाजा न करता, गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी चोर गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची दोनशे वर्षांची परंपरा tradition of two hundred years आजही अखंडपणे कायम आहे.History and Culture of Lord Ganesh 2022

History and Culture of Lord Ganesh 2022
चोर गणपती बप्पा झाले विराजमान

By

Published : Aug 29, 2022, 5:32 PM IST

सांगली गणेशाच्या आगमनाला काही अवधी बाकी आहे. मात्र सांगलीत seated Sangli गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. चोर गणपती Thief Ganapati Bappa म्हणून संबोधल्या जाणाऱ्या गणेशाची, मानाच्या गणेश मंदिरात गणपती पंचायतन संस्थानकडून प्रतिष्ठापना झाली आहे. कोणताही गाजावाजा न करता, गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी चोर गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची दोनशे वर्षांची परंपरा tradition of two hundred years आजही अखंडपणे कायम आहे.History and Culture of Lord Ganesh 2022

चोर गणपती बप्पा झाले विराजमान


सांगलीचे आराध्य दैवत म्हणून गणरायाची नगरी म्हणून ओळखसंपूर्ण सांगलीकरांची गणेशावर मोठी श्रद्धा आहे. सांगली गणपती पंचायतन तर्फे दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. सांगली संस्थांचे राजे पटवर्धन यांनी गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा सुरु केली. आणि दरवर्षी सांगलीमध्ये पटवर्धन घराण्याकडून हा गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. आता काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. पण त्याआधी गणपती मंदिरामध्ये चोर गणपतीच्या पाऊलांचे आगमन झाले आहे.


खरे तर गणेश चतुर्थीला सर्वत्र थाटामाटात गणेशाचे आगमन होते. मात्र गणपती पंचायतन मध्ये दोन दिवस अगोदर गणेशाचे आगमन होते. कोणालाही माहिती न पडता गणेशाची स्थापना होते,आणि या प्रथेला चोर गणपती म्हणून संबोधले जाते. सांगली मध्ये गेल्या पाऊणे दोनशे वर्षाहुन अधिक काळा पासून ही परंपरा सुरु आहे. आज पहाटे गणेश मंदिरात प्रथेप्रमाणे या चोर गणपतीचे आगमन झाले आहे. मोठ्या भक्तिमय वातावरणात चोर गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मंदिरातील मुख्य गणेश मूर्तीच्या दोन्ही बाजूला, चोर गणपतीची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या गणपतीचे विसर्जन होत नाही. या चोर गणपतीची मूर्ती कागदी लगदयापासून बनवली जाते. दीड दिवसा नंतर हे चोर गणपती सुखरूप ठिकाणी हलवण्यात येतात. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला या चोर गणपतीचे प्रतिष्ठापणा करण्याची हि परंपरा असून आजही मोठ्या भक्तीने जोपसण्यात येत आहे.



या गणपती बरोबरच गणेश चतुर्थीला नियमित गणेशाची स्थापना होते.गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे गणपती पंचायतन ट्रस्टकडून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. मात्र यंदाच्या वर्षी पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे.History and Culture of Lord Ganesh 2022




हेही वाचाGanesh Chaturthi Puja 2022 बुधवारी या शुभ मुहूर्तावर होणार गणेशाचे आगमन

ABOUT THE AUTHOR

...view details