महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत कोरोनाचे अर्धशतक, एकूण रुग्णसंख्या ५१ वर - सांगली कोरोना न्यूज

शुक्रवारी कोरोनाचे आणखी नवे ८ रुग्ण समोर आल्याने जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे अर्धशतक पार झाले असून, उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ५१ वर पोहचली आहे.

sangli corona
सांगलीत कोरोनाचे अर्धशतक

By

Published : May 30, 2020, 7:15 AM IST

सांगली- जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे अर्धशतक आता पूर्ण झाले आहे. शुक्रवारी जिल्ह्यात आणखी आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईहून आलेल्या व कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कातील हे आठ जण आहेत. जत खानापूर, कडेगाव, शिराळा तालुक्यातील व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. तर, कडेगाव तालुक्यातील एक कोरोनाबाधित व्यक्ती शुक्रवारी कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ५१ वर पोहोचली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

सांगली जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने अर्धशतक पार केले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा जिल्ह्यातील आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामधील काहीजण हे मुंबईहून आलेले आहेत. तर काहीजण हे मुंबईहून आलेल्या कोरोनाबाधितांच्या संपर्कातील आहेत.

यामध्ये जत तालुक्यातील औंढी येथील मुंबईहून आलेला ५४ वर्षीय पुरुष , खानापूरच्या करंजे येथील मुंबईहून आलेला ३० वर्षीय तरुण, शिराळयाच्या रेड येथील एक २० वर्षीय तरुण व खिरवडे येथील ५४ वर्षीय व्यक्ती, जे मुंबईहून आलेल्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आले होते, कडेगावचे नेर्ली येथील २८ वर्षीय तरुण जो मुंबईहून आलेल्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आला होता. तर तासगावच्या कचरेवाडी येथील २८ वर्षीय तरुण आणि कडेगावच्या आंबेगावमध्ये मुंबईहून आलेल्या कोरोनाबाधिताच्या १२ वर्षीय मुलगी आणि ९ वर्षीय मुलाचा समावेश आहे.

यासर्वांवर मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर कडेगावच्या सोहोली येथील उपचार घेणारा ५४ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्ती हा कोरोनामुक्त झाला असून, त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आले आहे. शुक्रवारी कोरोनाचे आणखी नवे ८ रुग्ण समोर आल्याने जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे अर्धशतक पार झाले असून, उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ५१ वर पोहचली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details