सांगली- प्रसिद्ध सिनेअभिनेते प्रकाश राज यांची उद्या (शुक्रवारी) सांगलीमध्ये सभा होणार आहे. मिरजेच्या जवाहर चौक येथे प्रकाश राज यांची तोफ धडाडणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली लोकसभेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ प्रकाश राज यांची सभा होत आहे.
प्रकाश राज यांची स्वाभिमानीच्या प्रचारार्थ शुक्रवारी सांगलीत सभा
प्रसिद्ध सिनेअभिनेते प्रकाश राज यांची उद्या (शुक्रवारी) सांगलीमध्ये सभा होणार आहे. मिरजेच्या जवाहर चौक येथे प्रकाश राज यांची तोफ धडाडणार आहे.
प्रकाश राज यांची स्वाभिमानीच्या प्रचारार्थ शुक्रवारी सांगलीत सभा
दक्षिणेतील सुपरस्टार व बॉलिवूड अभिनेते प्रकाश राज आपल्या निवडणूकीचा प्रचार संपवून आता मोदी विरोधात प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रात येत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध असल्याने शेट्टी यांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत. त्यामुळे आता उद्याच्या सभेत प्रकाश राज भाजपविरोधात काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.