सांगली -दिवसेंदिवस सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. आज (शनिवार) एकाच दिवसात कोरोनामुळे ३ जणांचा बळी गेला आहे. तर दिवसभरात ४८ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. ज्यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील ३८ जणांचा समावेश आहे. तर उपचार घेणारे २ जण आज कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ४८६ तर एकूण रुग्णांची नोंद ९५० झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली.
सांगलीत कोरोनाचा कहर; दिवसभरात ४८ नव्या रुग्णांची भर, तर ३ जणांचा मृत्यू - सांगली न्यूज
दिवसेंदिवस सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. आज (शनिवार) एकाच दिवसात कोरोनामुळे ३ जणांचा बळी गेला आहे. तर दिवसभरात ४८ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. ज्यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील ३८ जणांचा समावेश आहे.
आज एकाच दिवसात उपचार घेणाऱ्या ३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील विश्रामबाग येथील ३६ वर्षीय महिला, मिरज शहरातील ब्राह्मणपुरी येथील ८७ वर्षीय पुरुष आणि शिराळा तालुक्यातील येळापूर येथील ३८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना मृत्यूचा आकडा २९ झाला आहे. तर आज दिवसभरात आणखी ४८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील तब्बल ३८ जणांचा समावेश आहे. ज्यामध्ये सांगली शहरातील ३० आणि मिरज शहरातील ८ जणांचा समावेश आहे.
आज दिवसभरात उपचार घेणारे २ जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देऊन इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आले आहे. तसेच कोरोना उपचार घेणारे १८ रुग्ण हे अतिदक्षता विभागात उपचार घेत असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. यापैकी ९ जण हे ऑक्सिजनवर तर ९ जण हे नॉन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर आहेत.
आज वाढलेले रुग्ण व कोरोनामुक्त झालेले रुग्ण यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ४८६ झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९५० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी आजपर्यंत ४३५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २९ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.