महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना काळात निवडणुका घेणे म्हणजे राज्यात तिसऱ्या लाटेला आमंत्रण- डॉ. सुभाष साळुंखे - To hold elections

कोरोना काळात निवडणुका घेणे म्हणजे राज्यात तिसऱ्या लाटेला आमंत्रण देण्यासारखे आहे, असे स्पष्ट मत राज्याच्या टास्क फोर्सचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी व्यक्त केले आहे.

आरोग्य सल्लागार डॉ.सुभाष साळुंखे
आरोग्य सल्लागार डॉ.सुभाष साळुंखे

By

Published : Jul 15, 2021, 4:01 PM IST

सांगली -कोरोना काळात निवडणुका घेणे म्हणजे राज्यात तिसऱ्या लाटेला आमंत्रण देण्यासारखे आहे, असे स्पष्ट मत राज्याच्या टास्क फोर्सचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे या पुढच्या कोरोना काळात जर सार्वत्रिक निवडणूक किंवा सार्वजनिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्यास तिसऱ्या लाटेसाठी आपण स्वतःहून पायावर दगड मारून घेण्यासारखे आहे, असा स्पष्ट इशाराही डॉ. साळुंखे यांनी दिला आहे. ते सांगलीमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाहणी दौऱ्याप्रसंगी बोलत होते.

कोरोना काळात निवडणुका घेणे म्हणजे राज्यात तिसऱ्या लाटेला आमंत्रण- डॉ. सुभाष साळुंखे

टास्क फोर्स सल्लागार जिल्हा दौऱ्यावर

सांगली जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य सल्लागार व माजी आरोग्य संचालक सुभाष डॉ. साळुंखे जिल्हा दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सांगलीमध्ये डॉक्टर साळुंखे यांनी महापालिका व जिल्हा आरोग्य पथकासह पाहणी केली. यावेळी महापालिकेमध्ये बैठक घेत प्रशासनासोबत साळुंखे यांनी संवाद साधला.

महिना अखेर कोरोना आटोक्यात -
यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉक्टर साळुंखे म्हणाले तिसऱ्या लाटेसाठी राज्यसरकार सज्ज असल्याचे सांगून तिसऱ्या लाटेसाठी आवश्यक खबरदारी घेतली असून लोकसहभाग झाला, तर तिसरी लाट येणारही नाही. मात्र नागरिकांनी सुद्धा सहकार्य केले पाहिजे, असे मतही डॉ. साळुंखे यांनी व्यक्त केले. तसेच जिल्ह्यात काही ठिकाणी निवडणुका झाल्या. त्यामुळे कोरोना वाढला आहे. तसेच नागरिकांनी कोरोना झाल्यावर होम आयसोलेशनवर भर दिला आहे. तर अनेक जण उशिरा रुग्णालयात दाखल झाले, याचा परिणाम सांगली जिल्ह्यातील कोरोनासंख्या वाढली आहे. असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील या महिना अखेर कोरोना आटोक्यात येईल, असे मतही डॉक्टर साळुंखे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा -केंद्र सरकारकडून इम्पेरिकल डेटा मिळावा.. छगन भुजबळांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

ABOUT THE AUTHOR

...view details