महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

म्हणून...घडला म्हैसाळचा हत्याकांड, असा होता अंगावर काटा आणणारा हत्याकांडाचा थरारक घटनाक्रम... - Veterinary doctor Manik Vanmore family massacre

हा सर्व प्रकार मांत्रिकाने वनमोरे कुटुंबीयांना गुप्तधनाच्या अमिषा पोटे उकळलेल्या पैशाच्या तागाद्यातून केल्याचं स्पष्ट झाले आहे. मांत्रिक आब्बास बागबान व त्याचा साथीदार धीरज सूर्यवंशी या दोघांनाही अटक केली असून दोघांच्या वर खुनाचे गुन्हे दाखल केले आहेत. शिवाय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत ही कलम लावण्यात आले आहे. तसेच अब्बास याच्या सोलापूर येथील घरावर छापा टाकला असता,त्याच्या घरातूनही काळया जादूचे साहित्य आणि त्याचबरोबर वनमोरे कुटुंबीयांच्याकडे सापडलेले आत्महत्येची चिट्टीच्या दोन प्रति सापडल्या आहेत,आणि या दोन्ही चिठ्ठ्या या घटनेच्या आधीच लिहिल्याचं समोर आलेला आहे. मात्र हस्ताक्षर वनमोरे कुटुंबीयांचेच आहे का ? याबाबतीत आता तपास सुरू आहे,पण गुप्तधनाच्या अंधश्रद्धेमधूनच हा सर्व हत्याकांड झाल्याचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी स्पष्ट केले आहे.

thrilling sequence of sangli district mahisal massacre
म्हैसाळचा हत्याकांड

By

Published : Jul 11, 2022, 4:01 PM IST

सांगली -संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या म्हैसाळ हत्याकांडा मागचं कारण आणि हत्याकांडाचा थरार अखेर उघडकीस आले आहे. सांगली पोलिसांनी अत्यंत धक्कादायक माहिती उघडकीस आणली आहे. गुप्तधनाच्या अंधश्रद्धे मधूनच हा हत्याकांड झाला आहे. वनमोरे यांच्या घरात आधी गुप्तधनासाठी विधी करून कुटुंबाला पाण्याच्या 9 बाटल्यातून विषारी औषध देऊन मांत्रिकाने हा हत्याकांड केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवाय हत्याकांड आधी वनमोरे बंधूंनी लिहलेल्या सुसाईड नोट, वनमोरे यांचे कोरे चेक मांत्रिकाच्या घरी सापडले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.


25 सावकारांच्या विरोधात गुन्हे दाखल -20 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे घडली होती. म्हैसाळ या ठिकाणी राहणारे पशुवैद्यकीय डॉक्टर माणिक वनमोरे आणि त्यांचे शिक्षक बंधू असणारे पोपट वमनोरे यांच्या नऊ जणांच्या कुटुंबाचे मृतदेह एकाच वेळी आढळून आले होते. सुरुवातीला घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीमुळे ही सामूहिक आत्महत्या असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलं होतं. त्यानुसार या प्रकरणी पहिल्यांदा पोलिसांनी 25 सावकारांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते. सावकारीच्या जाचाला कंटाळून हे आत्महत्या केल्याचा प्रकार घडल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालं होतं. पण कुठेतरी हा घातपात असल्याचा संशय देखील पोलिसांच्या मनात होता. कारण घटनास्थळी अनेक गोष्टी या संशयास्पद होत्या. त्याच बरोबर वनमोरे नातेवाईकांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर आली होती.


मांत्रिकांकडून हत्याकांड -मिरजेचे पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्या नेतृत्वाखाली प्रकरणाचा गतीने तपास सुरू झाला.ज्यामध्ये अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे गुप्तधनाच्या आमिषामध्ये अडकलेल्या वनमोरे कुटुंबियांचा मांत्रिकांकडून हत्याकांड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मिरज पोलिसांनी सोलापूर येथील मांत्रिक अब्बास बागवान आणि त्याचा साथीदार धीरज सूर्यवंशी या दोघांनाही अटक केली. आता या अटकेनंतर मांत्रिकाकडून हत्येचे कारण आणि हत्येच्या घटनाक्रमाचा उलगडा झाला आहे.

गुप्तधनाच्या आमिषाने घात - पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषद घेऊन वनमोरे कुटुंबीयांच्या हत्याकांडेच्या मागचं कारण आणि हत्याकांडाचा घटनाक्रम स्पष्ट करण्यात आला आहे. वनमोरे कुटुंब हे गुप्तधनाच्या आमिषात अडकले होते. यातून गेल्या चार वर्षांपासून सोलापूर येथील मांत्रिक अब्बास बागवान आणि त्याच्या साथीदार धीरज सूर्यवंशी यांच्या संपर्कात होतं.आणि वनमोरे कुटुंब व मांत्रिक मिळून गुप्तधनाच्या मागे लागले होते. यासाठी मांत्रिकाकडून वेळोवेळी गुप्तधन मिळवण्यासाठी वेगवेगळ्या विधी पूजा आणि काळ्या जादूचा प्रकार करण्यात आला होता.हे सर्व होऊनही गेल्या चार वर्षांमध्ये मनमोरे कुटुंबीयांना गुप्तधन मिळालं नव्हतं,पण हे गुप्तधन मिळवण्यासाठी मांत्रिक अब्बास बागवान याला वेळोवेळी वनमोरे कुटुंबीयांकडून मोठ्या प्रमाणात पैसे देण्यात आले होते, हे सर्व पैसे वनमोरे कुटुंबीयांनी गावातील अनेक लोक व सावकारांकडून व्याजाने घेतले होते. काही महिन्यांपूर्वी वनमोरे कुटुंबीयांनी मांत्रिकाकडे गुप्तधन किंवा पैसे परत देण्याचा तगादा लावला होता. त्यामुळे मांत्रिक आब्बास बागवान हा अस्वस्थ होता.

वनमोरे कुटुंबीयांच्या हत्याकांडाचा खेळ - मांत्रिक अब्बास व त्याचा साथीदार धीरज सूर्यवंशी या दोघांनीही कुटुंब संपवण्याचा निश्चय केला. त्या दृष्टीने 19 जूनला मांत्रिक अब्बास आणि धीरज सूर्यवंशी हे दोघेही सोलापूर येथून गाडीने म्हैसाळ या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर या दोघांनी गुप्तधनासाठी विधी करावा लागेल असं वनमोरे बंधूंना सांगितलं. रात्री एक वाजल्यानंतर काळ्या जादूच्या विधीचा आणि वनमोरे कुटुंबीयांच्या हत्याकांडाचा खेळ सुरू झाला. मांत्रिक अब्बास व त्याचा साथीदार पहिल्यांदा पोपट वनमोरे यांच्या घरी पोहचले होते. मग तिथे चहापाण झाल्यावर वनमोरे कुटुंबीयांना अकराशे गव्हाचे दाणे आणायला सांगितले. मग ते दाणे प्रत्येकाला सात वेळा मोजण्यास सांगितलं. काही वेळानंतर मांत्रिकाने पोपट वनमोरे, त्यांची पत्नी, मुलगी व मुलगा शुभम या सर्वांना टेरेसवर नेले. त्या ठिकाणी विधी पार पडला. त्याचवेळी मांत्रिकाने आपल्या सोबत विषारी औषधाच्या गोळ्याची पावडर करून लिक्विडद्वारे बनवलेल्या विषाच्या पाण्याच्या बाटल्या मंत्रोच्चार करून तिघांनाही दिल्या.आणि त्याखाली जाऊन आपापल्या खोलीमध्ये जाऊन पिण्यास सांगितले.

डॉक्टर माणिक वनमोरे यांच्या घरीही हत्याकांडाची पुनरावृत्ती -मग तेथून मांत्रिक अब्बास आणि धीरज हे दोघेही शुभम याला घेऊन डॉक्टर माणिक वनमोरे यांच्या घरी पोहोचले, तिथेही अकराशे गव्हाचे दाणे घेऊन प्रत्येकाला 7 वेळा मोजण्यास सांगितले. मग टेरिसवर या सगळ्यांना नेऊन, तिथे पुन्हा विधी होऊन मांत्रिकाने आपल्याकडील असणाऱ्या सहा बाटल्या देऊन,सर्वांना खाली जाऊन प्यायला सांगितले. त्याप्रमाणे सर्वांनी गुप्तधनाच्या आमिषा पोटी मांत्रिकावर विश्वास ठेवून दिलेल्या बाटल्यातील पाणी डोळे झाकून प्यायले. त्यानंतर सगळे मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर पहाटे साडेचार वाजता मांत्रिक अब्बास आणि धीरज सुर्यवंशी हे दोघेही निघून गेले.

हस्ताक्षर वनमोरे कुटुंबीयांचेच आहे का ? हा सर्व प्रकार मांत्रिकाने वनमोरे कुटुंबीयांना गुप्तधनाच्या अमिषा पोटे उकळलेल्या पैशाच्या तागाद्यातून केल्याचं स्पष्ट झाले आहे. मांत्रिक आब्बास बागबान व त्याचा साथीदार धीरज सूर्यवंशी या दोघांनाही अटक केली असून दोघांच्या वर खुनाचे गुन्हे दाखल केले आहेत. शिवाय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत ही कलम लावण्यात आले आहे. तसेच अब्बास याच्या सोलापूर येथील घरावर छापा टाकला असता,त्याच्या घरातूनही काळया जादूचे साहित्य आणि त्याचबरोबर वनमोरे कुटुंबीयांच्याकडे सापडलेले आत्महत्येची चिट्टीच्या दोन प्रति सापडल्या आहेत,आणि या दोन्ही चिठ्ठ्या या घटनेच्या आधीच लिहिल्याचं समोर आलेला आहे. मात्र हस्ताक्षर वनमोरे कुटुंबीयांचेच आहे का ? याबाबतीत आता तपास सुरू आहे,पण गुप्तधनाच्या अंधश्रद्धेमधूनच हा सर्व हत्याकांड झाल्याचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details