महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खेळताना नाल्यात पडून तीन वर्षाच्या बालकाचा मृत्यू - सांगली महापालिका बातमी

नाल्यात बुडून झालेल्या मृत्यू प्रकरणी स्थानिक नागरिकांनी नगरसेवक आणि पालिका प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला. वारंवार नाल्या शेजारी भिंत बांधण्याबाबत मागणी करून देखील दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचा आरोप करत तातडीने नाल्यावर तटभिंती बांधावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली.

three years old boy death due to falls in nala at sangli
खेळताना नाल्यात पडून तीन वर्षाच्या बालकाचा मृत्यू

By

Published : Aug 11, 2021, 8:46 PM IST

Updated : Aug 11, 2021, 9:04 PM IST

सांगली - नाल्यात पडून एका तीन वर्षीय चिमुरड्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. यासिन इस्माईल शेख,असे या मुलाचे नाव आहे.मिरज शहरातील ख्वाजा वसाहत याठिकाणी ही दुर्घटना घडली. मुलांच्या सुरक्षेसाठी या नाल्या शेजारी तातडीने तटभिंत बांधून देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

खेळताना नाल्यात पडून तीन वर्षाच्या बालकाचा मृत्यू
खेळताना नाल्यात पडून बालकाचा मृत्यूमिरज शहरातील प्रभाग 20 मधील ख्वाजा वसाहत येथील राजेश प्लास्टिक कंपनीच्या पाठीमागे असलेल्या एका नैसर्गिक नाल्यात मंगळवारी एक तीन वर्षांच्या बालकाचा पडून मृत्यू झाला आहे. यासिन इस्माईल शेख वय 3 वर्षे असे बालकाचे नाव आहे.यासीन हा खेळत असताना नाल्या शेजारी गेला आणि खुल्या असणाऱ्या नाल्यात पडला. मात्र, याची कोणालाही कल्पना नव्हती. काही वेळानंतर घरातील नातेवाईकांनी यासीन याचा शोध सुरू केल्यानंतर नाल्या शेजारी यासीन याची चप्पल आढळून आली. त्यानंतर नाल्यात शोध सुरू केला असता. काही अंतरावर नाल्यात यासीनचा मृतदेह तरंगत असताना आढळून आला. त्यांनतर नागरिकांना यासिनचा मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी यासीनला मृत घोषित केले.तातडीने नाल्यावर तटभिंत बांधा..दरम्यान नाल्यात बुडून झालेल्या मृत्यू प्रकरणी स्थानिक नागरिकांनी नगरसेवक आणि पालिका प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला. वारंवार नाल्या शेजारी भिंत बांधण्याबाबत मागणी करून देखील दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचा आरोप करत तातडीने नाल्यावर तटभिंती बांधावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली.
Last Updated : Aug 11, 2021, 9:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details