सांगली- पुणे पदवीधर मतदार संघाचे आमदार अरुण लाड यांनी सांगली प्रशासनाला रुग्णालयासाठी तीन व्हेंटिलेटर भेट स्वरूपात दिले आहेत. शरद पवारांनी कोरोना परिस्थिती मदत करण्याच्या केलेल्या आवाहनानुसार हे मदत करण्यात आल्याचं आमदार अरुण लाड यांनी स्पष्ट केले आहे.
आमदार फंडातून व्हेंटीलेटरची मदत
कोरोनाच्या परिस्थितीमध्ये प्रशासनालाही अनेक पातळ्यांवर अडचणीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये व्हेंटिलेटर सारख्या साधनसामुग्रीची मोठी गरज आजही रुग्णालयात आहे. हीच गरज ओळखून पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार व क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी सांगलीच्या शासकीय करून रुग्णालयासाठी 3 व्हेंटीलेटर भेट स्वरूपात दिले आहेत. आधुनिक पद्धतीचे व्हेंटिलेटर जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांच्या हस्ते या व्हेंटीलेटरचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय साळुंखे, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य शरद लाड उपस्थित होते.