सांगली - एका मागोमाग सलग भूकंपाचे तीन धक्के बसल्याने जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली परिसर हादरला आहे. सकाळच्या सुमारास ३.८ ते २.९ इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के चांदोली परिसराला बसले.
एकापाठोपाठ चांदोलीत भूकंपाचे तीन धक्के; नागरिक भयभीत - sangali
शिराळा तालुक्यातील चांदोली परिसराला एका मागोमाग सलग भूकंपाचे तीन धक्के बसले आहेत. हे ३.८ ते २.९ इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के होते.

गुरुवार सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा पहिला धक्का चांदोली परिसराला बसला. हा धक्का ३.५ रिस्टर स्केल तीव्रतेचे होता. हा कमी तीव्रतेचा धक्का असल्याने नागरिकांना फारसे काही जाणवले नाही. मात्र, दोन मिनिटांच्या अंतराच्या फरकाने पुन्हा एक 3.8 रेस्टर स्केलचा धक्का बसला. जो पहिल्या धक्क्यापेक्षा जास्त तीव्रतेचा धक्का होता.
सलग दोन धक्के बसल्यामुळे नागरिक भयभीत होऊन आपल्या घराबाहेर पडले. हा धक्का थांबतो न थांबतो तोच लगेच ,पुन्हा ८ वाजून ३७ मिनिटांच्या सुमारास आणखी एक तिसरा भूकंपाचा धक्का जाणवला, जो २.९ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता.