महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगली पोलिसांकडून पाच घरफोड्या उघडकीस, तिघांना अटक - सांगली पोलीस अधीक्षक

सांगली पोलिसांनी तिघा चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आले आहे. याबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

अटकेतील आरोपींसह पोलीस
अटकेतील आरोपींसह पोलीस

By

Published : Oct 3, 2020, 9:14 PM IST

Updated : Oct 3, 2020, 9:36 PM IST

सांगली- घरफोडी करणाऱ्या एका टोळीला सांगली शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. तीन जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आणत 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सांगली पोलिसांकडून पाच घरफोड्या उघडकीस, तिघांना अटक

करण रामा पाटील (वय 21 वर्षे), रोहीत मधुकर गोसावी (वय 20 वर्षे) आणि रोहीत बाळु सपाटे (वय 19 वर्षे, सर्व रा.वाल्मिकी आवास योजना जुना बुधगाव रोड सांगली), अशी या अटकेत असलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

त्यामुळे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या आदेशानुसार घरफोड्या करणाऱ्यांचा शोध सुरू होता. शोध घेत असतानाच रेकॉर्डवरील सराईत तिघा चोरट्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर या तिघांनी घरफोडीची कबुली दिली आहे. त्यानंतर तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर यापूर्वी सांगली शहर, संजयनगर, कुपवाड एमआयडीसी याठिकाणी चोरी व घरफोडी यासारखे गुन्हे दाखल आहेत.

यावेळी त्यांच्याकडून घरफोडीतील चोरी करण्यात आलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करत जप्त करण्यात आला आहे. सांगली शहर पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर आणि शहर पोलीस निरीक्षक अजय सिंधकर यांच्या पथकाकडून या घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. तर या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा -केंद्राचा कृषी, कामगार कायदा म्हणजे लोकशाही मारण्याचे पाप; राज्यमंत्री विश्वजीत कदमांची टीका

Last Updated : Oct 3, 2020, 9:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details