सांगली - पाच हजारांची लाच घेतल्याप्रकरणी सांगलीत महिला उपजिल्हाधिकारीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सांगली येथे प्रादेशिक अधिकारी म्हणून असणाऱ्या उपजिल्हाधिकारी आणि त्यांच्या कार्यालयातील सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक व लिपिकाला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. सांगली लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
५ हजारांची लाच घेताना महिला उपजिल्हाधिकाऱ्यांसह तिघांना अटक
उपजिल्हाधिकारी तथा प्रादेशिक अधिकारी स्वाती शेंडे, सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक सुभाष माळी व कंत्राटी लिपिक भूपाल कुरणे या तिघांना अटक करण्यात आली आहे. सांगलीच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
सांगलीच्या कडेगाव येथील तक्रारदाराला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून लीज वर जमीन मिळाली आहे. या तक्रारदाराच्या पत्नीला त्या जागेत उद्योगासाठी बँकेकडून कर्ज मंजूर झाले आहे. मात्र, सदर कर्ज मिळण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून कन्सेट प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यासाठी त्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे मागणी केली होती. तसेच त्याबाबतची कागदपत्रांची पूर्तता केली होती. मात्र, कार्यालयातील कंत्राटी लिपिक, सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक आणि उपजिल्हाधिकारी तथा प्रादेशिक अधिकारी यांनी प्रमाणपत्राच्या बद्दल बक्षीस म्हणून ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची तक्रार दिली होती. त्यानुसार त्याची पडताळणी करून सांगलीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयात सापळा रचून तक्रारदाराकडून ५ हजारांची लाच घेताना या दोघांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
उपजिल्हाधिकारी तथा प्रादेशिक अधिकारी स्वाती शेंडे सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक सुभाष माळी व कंत्राटी लिपिक भूपाल कुरणे या तिघांना अटक करण्यात आली आहे. सांगलीच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. तर उपजिल्हाधिकारी लाच घेताना सापडल्याच्या या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.