सांगली -गोवा बनावटीची 35 हजारांच्या विदेशी दारुसह एक लाख 37 हजारांचा मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक करण्यात आली. अजित मूर्ग्याप्पा कट्टीकर (वय 22), शांतीनाथ सुरेश चौगुले (वय 25), प्रमोद संभाजी हंडीफोड (वय 22, सर्व रा. मालगाव, ता. मिरज) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ते गोव्यातुन चोरट्यामार्गाने मिरज शहरातून दारूची तस्करी करत होते.
पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार याबाबत माहिती देताना हेही वाचा -कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात...राज्यात 20 हजार 295 नव्या रुग्णांची नोंद
दारू तस्करीचा पर्दाफाश -
मिरज शहर पोलिसांनी गोवा बनावटीच्या विदेशी दारूसह मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक केली आहे. शहरातील वखार भाग येथील बेडग फाटा या ठिकाणाहून एका वाहनातून मिरज तालुक्यातील मालगाव याठिकाणी दारुची तस्करी होणार असल्याची माहिती मिरज शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून संशयित चार चाकी वाहनाची झडती घेतली असता, वाहनांमध्ये वेगवेगळ्या कंपनीची 35 हजार 500 रुपयांची गोवा बनावट असणारी विदेशी दारू आढळून आली.
पोलिसांनी या दारुसह, चारचाकी असा एकूण एक लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गोवा बनावटीची असणारी ही विदेशी दारू गोव्यातून चोरट्या मार्गाने आणण्यात आल्याची कबुली या तिघांच्याकडून देण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी दिली.
हेही वाचा -कोरोना लशीवरील जीएसटी कपातीचा चेंडू मंत्रिस्तरीय समितीच्या कोर्टात!