सांगली-कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील यांची गुरुवारी रात्री निर्घृण हत्या झाली होती. या हत्याप्रकरणी शिवसेना उपजिल्हाप्रमुखासह तिघांना अटक करण्यात आली आहे. पूर्ववैम्यनस्यातून ही हत्या करण्यात आली आहे.
खून का बदला खून? राष्ट्रवादी नेत्याच्या हत्ये प्रकरणी शिवसेना उपजिल्हाप्रमुखासह तिघांना अटक - सांगली गुन्हे बातमी
मनोहर पाटील यांची 'डॅशिंग' या ठिकाणी काही अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी हल्ला करत हत्या केली. काही दिवसांपूर्वीच पलूस तालुक्यातील राष्ट्रवादीच्या एका नेत्याची निर्घृण हत्या झाल्याचा प्रकार घडला होता. त्यात पुन्हा आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.
हेही वाचा-'राज्यकर्ते अजून किती निर्भयांचे बळी जाण्याची वाट पाहणार आहेत'
मनोहर पाटील यांची 'डॅशिंग' या ठिकाणी काही अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी हल्ला करत हत्या केली. काही दिवसांपूर्वीच पलूस तालुक्यातील राष्ट्रवादीच्या एका नेत्याची निर्घृण हत्या झाल्याचा प्रकार घडला होता. त्यात पुन्हा आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.
याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी गतीने तपास करत काही तासांमध्येच या खुनाचा छडा लावला आहे. यात शिवसेनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख व कवठेमहांकाळ तालुक्याचे नेते दिनकर पाटील यांच्यासह तिघांना अटक केली आहे. दिनकर पाटील यांनी पुतण्या अभिजीत युवराज पाटील व विनोद बाजीराव पाटील यांच्या मदतीने हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे कवठेमहांकाळ पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे.
खून का बदला खुन से
काही वर्षांपूर्वी कवठेमहांकाळ याठिकाणी पवनचक्कीच्या वादातून मनोहर पाटील यांच्याशी संबंधित असणाऱ्या रामचंद्र जाधव या व्यक्तीचा निर्घृण खून झाला होता. याप्रकरणी दिनकर पाटील यांना अटक करण्यात आली होती. मात्र, या खटल्यातून दिनकर पाटील आणि त्यांच्या साथीदारांची सुटका झाली होती. मात्र, या खुनाचा बदला म्हणून दिनकर पाटील यांचे बंधू युवराज पाटील यांचीही काही वर्षांपूर्वी हत्या झाली होती. या खुनाच्या घटनेमध्ये मनोहर पाटील यांचा संबंध असल्याचा संशय होता. यातून खून का बदला खून म्हणून गुरुवारी रात्री मनोहर पाटील यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.