सांगली- थकीत जुनी देणी आणि ठेवी देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने वसंतदादा साखर कारखाना संचलित दत्त इंडिया कंपनीच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी कारखान्यासमोर धरणे आंदोलन करत कारखाना प्रशासनाचा निषेध केला.
थकीत देणी व ठेवीच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन - आंदोलन
थकीत जुनी देणी आणि ठेवी न दिल्यामुळे शेतकरी संघटनेने वसंतदादा साखर कारखाना संचलित दत्त इंडिया कंपनीच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी कारखान्यासमोर धरणे आंदोलन करत कारखाना प्रशासनाचा निषेध केला.
शेतकऱ्यांच्या दत्त इंडिया संचलित वसंतदादा पाटील साखर कारखान्याकडे १९९२ पासून सुमारे २०० कोटींपेक्षा अधिक ठेवी थकीत आहेत. शिवाय २०१४-१५ मध्ये गाळप झालेल्या उसाची बिलेही अद्याप कारखान्याने दिली नाहीत. यामुळे आज थकीत देणी आणि ठेवी देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने साखर कारखान्याविरोधात आंदोलन करण्यात आले.
यावेळी सभासद शेतकऱ्यांनी कारखाना कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. तसेच कारखाना प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तातडीने कारखान्याने शेतकऱ्यांच्या ठेवी आणि थकीत देणी अदा करावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.