यंदाच्या वर्षी राज्यात शेतीचे विक्रमी उत्पादन होईल, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचा विश्वास - कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम
राज्य सरकारकडून राबवलेल्या कृषी धोरणांमुळे महाराष्ट्रात गतवर्षी 12 टक्क्यांनी शेतीचे उत्पन्न वाढले आहे. यंदाच्या वर्षीही चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज असल्याने आधुनिक पद्धतीने खरीपाचे नियोजन शासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी शेतीचे विक्रमी उत्पादन होईल,असा विश्वास कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे.
सांगली -राज्य सरकारकडून राबवलेल्या कृषी धोरणांमुळे महाराष्ट्रात गतवर्षी 12 टक्क्यांनी शेतीचे उत्पन्न वाढले आहे. यंदाच्या वर्षीही चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज असल्याने आधुनिक पद्धतीने खरीपाचे नियोजन शासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी शेतीचे विक्रमी उत्पादन होईल,असा विश्वास कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कोरोना सेंटर, कलाकारांसाठी आर्थिक स्रोत बनले पाहिजे -
सांगलीतील नमराह कोरोना सेंटर या ठिकाणी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी सदिच्छा भेट दिली आहे. नमराह कोरोना सेंटरच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांवर माफक दरात उपचार करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर विश्वजीत कदम यांनी नमराह कोरोना सेंटरला भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, शहरासह ग्रामीण भागात आज अनेक कोरोना विलागीकरण कक्ष सुरू आहेत. त्या ठिकाणी रूग्णांच्या करमणुकीच्यासाठी आज जे कलाकार काम नसल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेले आहेत, त्यांना आर्थिक मदत देण्याबाबत राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केले आहे.