सांगली -जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात १३ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.यामध्ये महापालिका क्षेत्रातील ९ जणांचा समावेश आहे.त्यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या १९८ झालीय. शनिवारपर्यंत एकूण ४७२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात २६२ जण कोरोनामुक्त झाले आणि १२ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
सांगलीत १३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ; महापालिका क्षेत्रातील ९ जणांचा समावेश - सांगली लेटेस्ट न्यूज
सांगली जिल्ह्यात शनिवारपर्यंत ४७२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. २६२ जण कोरोनामुक्त झाले आणि १२ जणांचा मृत्यू झालाय.
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे.शनिवारी जिल्ह्यात आणखी १३ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील ९ जणांचा समावेश आहे. कोरोना लागण झालेल्यांच्या मध्ये आटपाडी तालुक्यातील कानकात्रेवाडी १,पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील २ ,तासगाव तालुक्यातील बोरगाव येथील १, तर सांगली महापालिका क्षेत्रातील हनुमान नगर येथील ३ ,१०० फुटी रोड, विठ्ठल नगर येथील १ ,कर्नाळरोड दत्ता नगर येथील १, वारणाली येथील १ ,कोल्हापूर रोड ,गुप्ते हॉस्पिटल जवळ १ आणि मिरज ब्राह्मणपुरी १ व मिरज इस्रायलनगर १ येथील रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या १९८ झाली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४७२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ४७२ पैकी २६२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.तर १२ जणांचा आता पर्यंत मृत्यू झाला आहे.