सांगली - राष्ट्र विकास सेना सांगली लोकसभा निवडणूक लढवणार असून आज त्यांनी आपल्या पक्षाकडून तृतीयपंथीला उमेदवारी जाहीर केली. मोना दिगंबर तुपलोंढे असे या तृतीयपंथी उमेदवाराचे नाव आहे.
तृतीयपंथी लढवणार सांगली लोकसभा निवडणूक - तृतीयपंथी
राष्ट्र विकास सेना सांगली लोकसभा निवडणूक लढवणार आहे. आज त्यांनी मोना दिगंबर तुपलोंढे या तृतीयपंथी उमेदवाराला उमेदवारी जाहीर केली.
सध्या सांगली लोकसभा निवडणुकीच्या मैदानात दिग्गज पक्षांच्या उमेदवारीचा तिढा कायम आहे. मात्र, राष्ट्र विकास सेनेने आज पत्रकार परिषद घेऊन तुपलोंढे या तृतीयपंथीची उमेदवार म्हणून निवड केली. सर्वच पक्षांकडून वंचित समाजाला डावलण्यात येत आहे. त्यामुळे वंचित घटकाला न्याय आणि सन्मान देण्यासाठी ही उमेदवारी जाहीर केली आहे, अशी माहिती राष्ट्रविकास सेनेचे पदाधिकारी सुधाकर गायकवाडआणि ओमस मोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी कोणत्याही परस्थितीत आपण ही निवडणूक लढवणार, असा विश्वास तुपलोंढे याने व्यक्त केला.