महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनचा फेरफटका पडला महागात, पोलिस असल्याची बातवणी करून महिलेला लुटले - sangli police news

पोलिस असल्याची बातवणी करून महिलेला लुटल्याचा प्रकार सांगलीत घडला आहे. या प्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगली
सांगली

By

Published : Apr 19, 2021, 9:46 PM IST

सांगली - लॉकडाऊनमध्ये फिरणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. पोलिस असल्याची बतावणी करून शहरातील एका महिलेचे दोन तोळ्यांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मंगल दिलीप नाईक यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाता विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

लॉकडाऊनचा फेरफटका पडला महागात -

शहरातील आमराई उद्यानाच्या पाठीमागे असणाऱ्या आप्पासाहेब पाटीलनगर याठिकाणी राहणाऱ्या मंगल नाईक या सायंकाळच्या सुमारास घरातून फिरायला बाहेर पडल्या होत्या. यावेळी मंगल यांच्या समोर एक व्यक्ती दुचाकीवरून समोर आला, त्याने मी पोलीस आहे, अशी बतावणी करत, सध्या लॉकडाऊन आहे, तुम्ही बाहेर का फिरत आहात,आमचे साहेब आलेत. तुमच्याकडे असलेले दागिने लवकर काढून घ्या,अन्यथा पोलीस कारवाई होईल,अशी भीती दाखवली. यानंतर घाबरलेल्या मंगला नाईक यांनी आपल्या गळ्यातील दोन तोळ्यांचे दागिने तातडीने काढून दिले, आणि त्या भामटयाने दागिने घेऊन पोबारा करताच आपली फसवणूक झाल्याची बाब मंगल नाईक यांच्या लक्षात आली. या फसवणूकी बाबतीत त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details