महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ATM Center Thief : एटीएम सेंटरमध्ये ग्राहकांना मदतीच्या बहाण्याने लावायचा चूना; अशी झाली अटक - एटीएम सेंटर चोरी सांगली

एटीएम सेंटरमध्ये हातचालखीने कार्ड बदलून खात्यातले पैसे काढणाऱ्या चोरट्यास (Thief arrested for stealing from ATM center) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. सुभाष जाधव,असे या कुख्यात चोराचं नाव आहे. त्याच्याकडून 101 एटीएम कार्ड आणि तीन लाखांची रोकड सह साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त (101 ATM card worth three and a half lakhs seized) करण्यात आला आहे. (ATM Center thief arrest Sangli) (Sangli Crime)

एटीएम सेंटरमध्ये चोरी करणाऱ्या आरोपीस शिताफीने अटक
एटीएम सेंटरमध्ये चोरी करणाऱ्या आरोपीस शिताफीने अटक

By

Published : Oct 12, 2022, 1:25 PM IST

सांगली :एटीएम सेंटरमध्ये हातचालखीने कार्ड बदलून खात्यातले पैसे काढणाऱ्या चोरट्यास (Thief arrested for stealing from ATM center) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. सुभाष जाधव,असे या कुख्यात चोराचं नाव आहे. त्याच्याकडून 101 एटीएम कार्ड आणि तीन लाखांची रोकड सह साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त (101 ATM card worth three and a half lakhs seized) करण्यात आला आहे. (ATM Center thief arrest Sangli) (Sangli Crime)

एटीएम सेंटरमध्ये चोरी करणाऱ्या आरोपीस शिताफीने अटक


रोडवर सापळा रचून चोरास अटक-सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून एटीएम कार्ड सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे पैसे काढून देण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांना चुना लावण्याचा प्रकार सुरू होता. अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या ठकसेन चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. सुभाष जाधव (वय 37) असे या चोरट्याचे नाव असून तो विटाच्या चंद्रसेननगर येथील राहणार आहे. हातचलाखीने फसवणूक करणाऱ्या या चोरट्याच्या तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला जाधव हा तासगावहून सांगलीकडे जाणार असल्याचे माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने माधवनगर येथील तासगावहून येणाऱ्या रोडवर सापळा रचून जाधव याला ताब्यात घेतले.

चोराकडे तब्बल 101 एटीएम कार्ड आढळले-त्यानंतर त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने वेगवेगळ्या ठिकाणी एटीएम सेंटरमध्ये पैसे काढून देण्याच्या बहाण्याने हातचलाखीने कार्ड बदलून ग्राहकांच्या खात्यावरील पैसे परस्पर काढले,असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्याकडून वेगवेगळ्या बँकेचे 101 एटीम कार्ड, 3 लाख रोकड आणि एक दुचाकी असे साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करत सुभाष जाधव याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 6 गुन्हे उघडकीस आले असून अधिक तपास सुरू असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details