महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुविधा अभावी सांगलीतील अंकलीच्या चेक पोस्टवरील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात

जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून महत्त्वाच्या कारणांमुळेच जिल्ह्यात प्रवेश देण्यात येत आहेत. यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर चेक पोस्टवरील पोलीस कर्मचारी आरोग्य सेवक, डॉक्टर्स हे रात्रंदिवस याठिकाणी पहारा देऊन नागरिकांची चौकशी, तपासणी करून त्यांना जिल्ह्यात प्रवेश देत आहेत.

अंकली चेक पोस्ट सांगली
सुविधा अभावी सांगलीतील अंकलीच्या चेक पोस्टवरील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात

By

Published : May 16, 2020, 3:42 PM IST

सांगली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर रात्र-दिवस पहारा देण्याचे काम करणारे पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुविधांच्या अभावी धोक्यात येत आहे. कोरोनाची काळजी घेणारे सांगली-कोल्हापूर सीमेवरील अंकली चेक पोस्ट येथील कर्मचारी पावसात, अंधारात जीव मुठीत घेऊन आपले कर्तव्य पार पाडत आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून महत्त्वाच्या कारणांमुळेच जिल्ह्यात प्रवेश देण्यात येत आहेत. यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर चेक पोस्टवरील पोलीस कर्मचारी आरोग्य सेवक, डॉक्टर्स हे रात्रंदिवस याठिकाणी पहारा देऊन नागरिकांची चौकशी, तपासणी करून त्यांना जिल्ह्यात प्रवेश देत आहेत.

सुविधा अभावी सांगलीतील अंकलीच्या चेक पोस्टवरील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात

मास्क, सुरक्षित अंतर राखत 'कोरोना योध्यांची' सर्व काम सुरू आहेत. असे असले तरी दुसर्‍या बाजूला या कर्मचाऱ्यांचा आरोग्य आता धोक्यात येत आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून अवकाळी पाऊस, तसेच वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे वीज पुरवठा खंडीत होत आहेत. परिणामी चेक पोस्टवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना अंधारातच राहून रस्त्यावर आपले कर्तव्य पार पाडावे लागत आहे.

सांगलीच्या अंकली चेक पोस्टवर असणारे पोलीस कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी पाऊस आणि अंधारातच तपासणी करण्याचे काम करत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी बांधून देण्यात आलेला मंडप हा केवळ कापडी आहे. पाऊस सुरू झाल्यावर या कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना इतरत्र आडोसा घ्यावा लागत आहे. त्यातच कोणी आल्यास त्यांना पावसात थांबवून तपासणी करावी लागते. तर पाऊस पडल्यावर आरोग्य तपासणीच्या मंडपात पाणी झिरपू लागते.

वीज पुरवठा खंडित झाल्यावर अंधारातच या सर्व पोलिस कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. पावसाने पडलेले पाणी डबक्यात साचते आणि त्याचा शेजारीच टेबल लावून आरोग्य कर्मचाऱ्यांना येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची तपासणी करावी लागते.

त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरवणे गरजेचे आहे. तरच पोलीस कर्मचारी,आरोग्य कर्मचारी कोरोनाविरोधात लढू शकतील. अन्यथा त्यांना इतर आजारदेखील होण्याची शक्यता बळावत आहे. सांगली-कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या अंकली येथील चेकपोस्टच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे सांगलीचे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी ..

ABOUT THE AUTHOR

...view details