सांगली- जिल्ह्यातील कुरळप गावात व परिसरातील गावांमध्ये भुरट्या चोरट्यांचा वावर वाढला आहे. कुरळपमध्ये दोन दिवसांपूर्वी येलूरला जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या शेतातील सोयाबीनची 9 पोती रातोरात लंपास केली होती. मागील काही महिन्यांपासून परिसरातील गावातील चोरीचे प्रमाण वाढले आहे.
सध्या कोरोनामुळे व्यापारीवर्ग व शेतकरी यांची आर्थिक घडी बिघडली असताना त्यांना भुरट्या चोरांचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या सुगीचे दिवस चालू असल्याने शेतांमधून सोयाबीन मळणी, भुईमूग काढणीचे कामे सुरू आहेत. त्यातच वादळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी मळलेले धान्य शेतातीलच शेडमध्ये ठेवत आहेत. यावरच चोर डल्ला मारत आहेत.