सांगली- परदेशवारी करून आल्याची माहिती लपवत रुग्ण तपासणी करणाऱ्या मिरजेतील दोघा डॉक्टरांवर सांगली महापालिका प्रशासनाने कारवाई केली आहे. दोन्ही डॉक्टरांचे रुग्णालय सील करत दोघांनाही होम क्वारंटाईन राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सांगलीच्या मिरजेतील दोघा डॉक्टरांच्यावर पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. शहरातील डॉ. सोमशेखर पाटील आणि डॉ. श्रीनिवास हे दोघेही 8 मार्च रोजी परदेशवारी करून परतले होते. त्यानंतर डॉ. सोमशेखर पाटील यांनी माहिती दिली त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. पण, त्यांनी आपले रुग्णालय सुरू ठेवत रुग्णतपासणी चालूच ठेवली होती. डॉ. श्रीनिवास यांनी प्रशासनाला कोणतीही माहिती न देता आपले रुग्णालय सुरु ठेवत रुग्ण तपासणी शल्यक्रिया चालूच ठेवले होते. ही बाब लक्षात येताच महापालिकेने त्यांचे रुग्णालय सील केले आहेत.