सांगली: सौदी अरेबिया (Saudi Arabia) येथील ओमानच्या समुद्रामध्ये (The Oman sea) जत मधील तिघे जण वाहून (The three were carried away) गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समुद्रात वाहून जात असल्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. मुळचे जत येथील असणारे अभियंता शशिकांत म्हमाणे व त्यांची दोन मुले,असे तिघेजण समुद्राच्या लाटांमुळे वाहून गेल्याचा हा प्रकार ओमान येथे घडला आहे.
The Oman sea: सौदीच्या ओमानमध्ये समुद्रात जतचे तिघे जण गेले वाहून,अभियंता पित्यासह दोन मुलांचा समावेश.. - Saudi Arabia
सौदी अरेबिया (Saudi Arabia) येथील ओमानच्या समुद्रामध्ये (The Oman sea) जत मधील तिघे जण वाहून (The three were carried away) गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समुद्रात वाहून जात असल्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. मुळचे जत येथील असणारे अभियंता शशिकांत म्हमाणे व त्यांची दोन मुले,असे तिघेजण समुद्राच्या लाटांमुळे वाहून गेल्याचा हा प्रकार ओमान येथे घडला आहे.
जत येथील अभियंता असणारे शशिकांत उर्फ विजय म्हमाणे हे संयुक्त अरब अमिरात येथील येथे एका कंपनीत इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. पत्नी व तीन मुलांच्यासह ते तिथे राहत होते. रविवारी ईदची सुट्टी असल्याने ते आपले कुटुंब व मित्रांसमवेत ओमान या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते. ते तिथे जात असतानाचा व्हिडिओ देखील त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला होता. त्यानंतर ओमान येथील समुद्र किनाऱ्यावर गेले असता, त्या ठिकाणी प्रचंड अशा लाटा उसळत होत्या. उसळत्या लाटांचा व्हिडिओ करणे सुरु असताना ,एक प्रचंड मोठी लाट आली आणि त्यामध्ये काहीजण लाटांच्या समवेत समुद्रात ओढले गेले. ज्यामध्ये शशिकांत म्हमाणेसह त्यांचा मुलगा श्रेयस आणि मुलगी श्रुती असे तिघे जण वाहून गेले आहेत. तर पत्नी सारिका व एक मुलगी बचावल्या गेल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत शशिकांत म्हमाणे यांचे बंधू राजाराम म्हमाणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता,ते तातडीने दुबईला गेल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.