सांगली - ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी 25 फेब्रुवारी रोजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत सांगलीत महामेळावा पार पडणार आहे. 27 रोजी यवतमाळ या ठिकाणी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सांगलीत झालेल्या बैठकीत ओबीसी नेत्यांच्याकडून देण्यात आली आहे.
सांगलीत पार पडणाऱ्या ओबीसी मेळाव्याच्या तारखेवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. 25 फेब्रुवारी रोजी ओबीसी जन मोर्चाच्या वतीने सांगलीत महामेळावा कोणत्याही परिस्थितीत पार पडणार असे स्पष्ट करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ओबीसी समाजातले प्रमुख लोक प्रतिनिधीही उपस्थित राहणार असल्याची माहिती ओबीसी नेते व औरंगाबादचे नगरसेवक बाळासाहेब सानप आणि लक्ष्मण हाके यांनी दिली आहे. 25 फेब्रुवारी रोजी सांगलीच्या स्टेशन चौक या ठिकाणी हा महामेळावा पार पडणार असून त्याच्या तयारीसाठी राज्यातील ओबीसी नेते आता सांगलीत दाखल होत आहेत. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात ओबीसी नेत्यांचा ठिक-ठिकाणी बैठका होत असल्याची माहितीही मेळावा स्वागताध्यक्ष अरुण खरमाटे,ओबीसी नेते बाळासाहेब सानप आणि लक्ष्मण हकके यांनी दिली आहे. तर 27 फेब्रुवारी रोजी यवतमाळ या ठिकाणी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याच प्रमुख उपस्थितीत ओबीसीचा दुसरा महामेळावा पार पडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.