महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देश व संविधान वाचवण्यासाठी देशात काँग्रेसची गरज -नाना पटोले

काँग्रेसने देशाला बलशाली केले. मात्र, केंद्रा सरकार देश आता विकायला निघाला आहे. त्यामुळे देश धोक्यात आल्याने सत्तेसाठी नव्हे तर देश आणि संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. सांगलीच्या कडेगाव या ठिकाणी आमदार मोहनराव कदम यांच्या लोकसेवा गौरव समारंभाच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

लोकसेवा गौरव समारंभ
लोकसेवा गौरव समारंभ

By

Published : Sep 10, 2021, 4:11 AM IST

सांगली - देशाला 75 वर्षात काँग्रेसने बलशाली केले. मात्र, केंद्रा सरकार देश आता विकायला निघाला आहे. त्यामुळे देश धोक्यात आल्याने सत्तेसाठी नव्हे तर देश आणि संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. सांगलीच्या कडेगाव या ठिकाणी आमदार मोहनराव कदम यांच्या लोकसेवा गौरव समारंभाच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
60 वर्ष काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ

काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम यांची गेल्या साठ वर्षापासून काँग्रेस पक्षासाठी केलेली सेवा या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा काँग्रेसकडून आमदार कदम यांचा लोकसेवा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कडेगावच्या वांगी येथील सोनहीरा साखर कारखाना परिसरात हा सोहळा पार पडला.

देश आणि संविधान धोक्यात

या प्रसंगी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलताना केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेस पक्षाने पंच्याहत्तर वर्षात देश बलशाली करण्याचे काम केले. मात्र, आता गेल्या काही वर्षांपासून केंद्रातील लोकं देश विकायला निघाले आहेत. त्यामुळे (2024)हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज देश आणि संविधान धोक्यात आले आहे. त्यामुळे कॉंग्रेसची सत्ता आली पाहिजे. ही सत्ता देश वाचवण्यासाठी असणार आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही तळागाळात जाऊन देश कसा विकायला निघालेले आहेत. याची जाणीव करून दिली पाहिजे, अशी अपेक्षाही पटोले यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details