महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...तर सांगलीत विनामोबदला दारू घरी पोहोचवू - liquor in sangli

शासनाने दारूविक्रीसाठी सशर्त परवानगी दिली आहे. साधारण पन्नास दिवस दारुविना राहिलेल्या मद्यप्रेमींनी दारुविक्री दुकानाबाहेर मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे सामाजिक अंतराचा फज्जा उडाला असून यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची भिती आहे. यामुळे सांगलीतील जनसेवा फळे-भाजीपाला विक्रेता संघटनेने परवानगी दिल्या भाजीपाल्यासह दारू विनाशुल्क घरपोच करण्याची तयारी दर्शविली आहे.

sangli photo
संग्रहीत छायाचित्र

By

Published : May 8, 2020, 3:50 PM IST

Updated : May 8, 2020, 6:05 PM IST

सांगली- आम्हाला कोरोनाची काळजी आहे, त्यामुळे आम्ही मद्यपींना घरपोच दारू सेवा देण्यासाठी तयार असल्याचे भूमिका सांगलीतील जनसेवा फळे-भाजीपाला विक्रेता संघटनेने जाहीर केली. तसेच विना मोबदला ही सेवा पुरवण्याचे स्पष्ट करत, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे परवानगी देण्याची मागणी केली आहे.

बोलताना संघटनेचे अध्यक्ष शंभूराज काटकर
मागील दीड महिना सांगली जिल्ह्याचे प्रशासन आणि शहरातील व्यापारी गर्दी टाळण्यासाठी सर्व ते प्रयत्न करत आहेत. लोकांना सामान्य दरामध्ये जनसेवा फळे-भाजीपाला विक्रेता संघटनेच्या माध्यमातून भाजी घरपोच करण्याची सोय प्रशासनाने परवानगी दिलेल्या 111 वाहनांद्वारे करीत आहे. आता याच संघटनेने याचा भाजीपाला विक्रीच्या गाड्यातून मोफत घरपोच दारू सेवा देण्याची भूमिका जाहीर केली आहे. संघटनेचे अध्यक्ष शंभूराज काटकर यांनी याबाबतीत परवानगी देण्याची मागणी राज्य उत्पादन विभागाकडे केली आहे. दारू खरेदी करण्यासाठी होणारी तळीरामांची दारू दुकानांवर होणारी तोबा गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सामाजिक जाणिवेच्या भावनेतून काटकर यांनी ही मागणी केली आहे.
यावेळी काटकर म्हणाले, सांगली जिल्ह्यात दारू विक्रीसाठी परवानगी देताना दारुसाठी होणाऱ्या संभाव्य गर्दीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने विचारच केला नव्हता असे दिसते. त्यामुळे दीड-दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या आणि अजूनही तीन दिवसानंतर त्या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन मद्यपींना करण्यात आले आहे. हे अंतर रहावे यासाठी दुकानदारांनीही योग्यती खबरदारी घेतली. पण, मद्यप्रेमींकडून सामाजीक अंतर पाळलेच जात नाही. देशी दारूच्या दुकानावर तर सहाशे ते सातशे लोक सामाजिक अंतर न पाळता उभे असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले आहे. असेच सुरू राहिले तर सांगली संकटात सापडायला फार वेळ लागणार नाही. जिल्हा प्रशासनाने या बाबीची गांभीर्याने दखल घ्यावी असे आम्हाला वाटते.

वास्तविक मद्य विक्रेत्यांना मागणीनुसार त्यांच्या परिसरात पार्सल सेवा सुरू ठेवण्याचे नियोजन उत्पादन शुल्क विभागाने केले पाहिजे. त्यांना जर ते शक्य नसेल, तर महापालिका क्षेत्रात आमच्या भाजीपाला विक्रेत्यांच्या गाड्या फिरत आहेत. ते मोबदला न घेता केवळ कोरोना रोखण्यासाठी सेवा द्यायला तयार आहेत. मद्य विक्रेत्यांनी ऑर्डर ऑनलाईन किंवा अन्य कोणत्याही मार्गाने पैसे स्वीकारून मद्य ज्यांच्याकडे पोचवायचे त्यांचा पत्ता दिल्यास, त्या-त्या भागातील विक्रेते भाजीपाल्यासह या वस्तू ही पोहोचवतील. मद्य पुरवणे चांगले की वाईट या वादात न पडता केवळ गर्दी टाळणे. लोकांचे हाल न होता कोरोनाचे संकटही टाळावे, या उद्देशाने आमची ही सेवा देण्याची तयारी असल्याचे शंभूराज काटकर यांनी स्पष्ट केले. रत राज्य उत्पादन शुल्क आणि दारू दुकानांनी घरपोच सेवा उपलब्ध करून द्यावी किंवा आम्हाला परवानगी द्यावी, ती आम्ही विनाशुल्क करू,अशी मागणी केली आहे.

हेही वाचा -सांगलीत चेक पोस्ट ओलांडणारा कोरोना संशयित ताब्यात; मिरज रुग्णालयात भर्ती

Last Updated : May 8, 2020, 6:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details