सांगली - केरळच्या महापुरापेक्षाही भयंकर सांगलीतील महापूर आहे. यावेळी पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात अनेक अडचणी येत आहेत. मात्र, तरीही शेवटच्या नागरिकाला सुरक्षितपणे पुरातून बाहेर काढणे, हेच ध्येय समोर ठेवून पूरग्रस्तांसाठी देवदूत ठरलेल्या आर्मीचे मेजर राजेश उप्रित यांच्या नजेरतून सांगलीच्या महापुराचे भीषण वास्तव जाणून घेतले आहे, आमचे सांगलीचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी.
महापुरात बुडालेली 'सांगली' पूरग्रस्तांसाठी देवदूत ठरणाऱ्या मेजर राजेश उप्रित यांच्या नजरेतून - सामाजिक कार्यकर्ते
सांगलीच्या महापुरामध्ये अडकलेल्या पूरग्रस्तांना वाचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सैनिक, नौदल आणि सामाजिक कार्यकर्ते पुरात अडकलेल्या हजारो नागरिकांना बाहेर काढत आहेत.
सांगलीच्या महापुरामध्ये अडकलेल्या पूरग्रस्तांना वाचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सैनिक, नौदल आणि सामाजिक कार्यकर्ते पुरात अडकलेल्या हजारो नागरिकांना बाहेर काढत आहेत. जवान महापूरातील बिकट परिस्थितीमध्ये नागरिकांची मदत करत आहेत.
सांगलीमध्ये मदतीसाठी याचना करणाऱ्या पूरग्रस्तांच्या रेस्क्यूसाठी पुणे डिव्हिजन लष्कर पथक अहोरात्र काम करत आहे. हे पथक मेजर राजेश उप्रित यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 5 दिवसांपासून सांगलीमध्ये तळ ठोकून आहे. पूराची भीषणता किती आहे सांगणे अवघड आहे. मात्र, या पूराची वास्तविकता मेजर राजेश उप्रित यांच्या नजरेतून पाहायला मिळाली. मेजर राजेश सुप्रित यांनी केरळमध्येही आलेल्या महापूरात रेस्क्यू ऑपरेशन करत हजारो लोकांना जीवदान दिले होते.