महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूरग्रस्तांच्या मदतीचा निर्णय मंगळवारी मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीत - उपमुख्यमंत्री - help to flood victims in sangli

महापुराच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (सोमवार) सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पलूस तालुक्यातील भिलवडी या ठिकाणी पूर परिस्थितीची पाहणी करत पूरग्रस्त निवारा केंद्रात जाऊन पूरग्रस्तांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला.

decision to help flood victims taken at CM's meeting , mumbai
मंगळवारी मुख्यमंत्र्याच्या बैठकीत पूरग्रस्तांच्या मदतीचा निर्णय

By

Published : Jul 26, 2021, 12:30 PM IST

Updated : Jul 26, 2021, 1:06 PM IST

सांगली -मंगळवारी आम्ही मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, संबंधित मंत्री आणि अधिकारी यासर्वांसोबत बैठक घेऊन पूरग्रस्तांना कशाप्रकारे मदत देता येईल याबाबत निर्णय घेतला जाईल. असे अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील पाहणी दौऱ्यादरम्यान सांगितले. दरम्यान हवामान खराब असल्यामुळे त्यांनी कोल्हापूर दौरा रद्द केला आहे. तर ते सांगली येथे आढावा बैठक घेऊन मुंबईकडे रवाना होणार आहे असे त्यांनी सांगितले.

मंगळवारी मुख्यमंत्र्याच्या बैठकीत पूरग्रस्तांच्या मदतीचा निर्णय

पूरग्रस्तांशी साधला संवाद -

महापुराच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (सोमवार) सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पलूस तालुक्यातील भिलवडी या ठिकाणी पूर परिस्थितीची पाहणी करत पूरग्रस्त निवारा केंद्रात जाऊन पूरग्रस्तांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

अजित पवार यांनी केली महापुराच्या परिस्थितीची पाहणी

पूरग्रस्त भागातील पाहणीनंतर लवकरच योग्य मदतीचा निर्णय -

अजित पवारांनी मुख्यमंत्री आणि आपण पुरग्रस्त आणि ज्या ठिकाणी दुर्घटना घडल्या त्या ठिकाणची पाहणी करत आहोत आणि नागरिकांच्या काय मागण्या आहेत लोकप्रतिनिधींच्या आणि प्रशासनाच्या काय सूचना आहेत. त्या जाणून घेत आहोत आणि यानंतर लवकरच मदतीच्या बाबतीत निर्णय घेण्यात येईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

कोल्हापूर दौरा रद्द -

कोल्हापूर दौरा खराब हवामानामुळे रद्द करण्यात आला असून, सांगलीमध्ये आढावा बैठक घेऊन सातारा येथून आपण मुंबईकडे रवाना होणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Last Updated : Jul 26, 2021, 1:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details