सांगली - संततधार पडणाऱ्या पावसामुळे सांगली ( Heavy rain in Sangli ) जिल्ह्यातल्या कृष्णा, ( Krishna River ) वारणा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे. वारणा नदी गेल्या तीन दिवसांपासून पात्रा बाहेर आहे, तर कोयना धरणातून सोडण्यात ( Release of water from Koyna dams ) आलेलं पाणी आणि पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आता वाढ झाली आहे. सांगलीमध्ये कृष्णा नदीचे पाणी पातळीमध्ये एका दिवसात दीड फुटाने वाढ झाली आहे. सध्याच्या घडीला 21 फुटी इतकी पातळी सांगलीच्या आयर्विन पूल या ठिकाणी झाली आहे.
पाणी पातळी मध्ये वाढ सुरू -सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ सुरू आहे. गेल्या आठ दिवसात फुटा-फुटाने पाणी पातळी मध्ये वाढ सुरू होती,त्यामुळे पातळी काल 19 वर स्थिर होती. मात्र, कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने कोयनेतून 1 हजार 50 क्यूसेक्स पाणी सोडण्यात आल्याने सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे कृष्णेची पातळी 21 फुटावर गेली आहे.
हेही वाचा - Maharashtra and India Rain live : देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस ! गुजरात आणि महाराष्ट्रात रेड अलर्ट, पाहा पावसाची स्थिती
अनेक छोटे-मोठे बंधारे पाण्याखाली -शिराळा तालुक्यातील पाऊसाची जोरदार बॅटिंग सुरूच आहे,गेल्या 24 तासात 37 मिली मीटर पाऊस झाला आहे. तर, चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी ( Heavy rain in Chandoli Dam ) कायम आहे. गेल्या 24 तासात 77 मिली मीटर पाऊसाची नोंद झाली आहे. त्यामुळे 34.40 टीएमसी पाणीसाठा असणाऱ्या धरणात आता 21.54 टीएमसी पाणी साठा निर्माण झाला असून धरण 62 टक्के भरले आहे. पावसा संततधार पावसामुळे वारणा नदीच्या पाणीपत्रीत झपाट्याने वाढ होऊन वारणा नदी पात्रा बाहेर पडली आहे. त्यामुळे नदीवरील असणारे अनेक छोटे-मोठे बंधारे पाण्याखाली गेली असून वारणा काठी पुरास्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.तर नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा - Amarnath Yatra Devotees Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या बसचा अपघात; 14 जण जखमी