सांगली- रेल्वे प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या एका चोरट्यास सांगली न्यायालयाने ५ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. सोनू तेजपाल प्रजापती असे या आरोपीचे नाव आहे. त्याला पुणे -मिरज रेल्वे मार्गावर प्रवाशी दांपत्यास लुटल्या प्रकरणी न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.
सांगलीत रेल्वेत गुंगीचे औषध देऊन प्रवाश्यांना लूटणाऱ्या आरोपीला ५ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा - सांगली
कॉफीमधून गुंगीचे औषध देऊन रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या सोनू तेजपाल प्रजापती याला सांगली जिल्हा न्यायालयाने ५ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
कॉफीमधून गुंगीचे औषध देऊन रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या सोनू तेजपाल प्रजापती याला सांगली जिल्हा न्यायालयाने ५ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. २३ ऑक्टोबर २०१६ रोजी अजितकुमार वरकडे व त्यांची पत्नी रेखा वरकडे (मध्यप्रदेश) हे गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसने प्रवास करत होते. यावेळी त्यांच्या शेजारी सोनू तेजपाल प्रजापती येऊन बसला. त्याने ओळख वाढवत वरकडे दाम्पत्यांना कॉफी मधून गुंगीचे औषध घालून पाजले. यानंतर बेशुद्ध झालेल्या पती-पत्नीच्या अंगावरील दागिने व त्यांच्या जवळचे पैसे लुटत पोबारा केला. जाग आल्यानंतर वरकडे दांम्पत्यांनी याबाबत तिकीट चेकरकडे तक्रार केली. तसेच याबद्दलची माहिती तात्काळ रेल्वे पोलीसांनाही देण्यात आली. पोलिसांनी आरोपी सोनूच्या वर्णनावरून त्याला काही वेळात सातारा रेल्वे स्टेशनवरून मुद्देमालासह अटक केली होती.
याप्रकरणी मिरज रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. या खटल्या प्रकरणी सांगली जिल्हा न्यायालयाने सोनू प्रजापती याला दोषी ठरवत ५ वर्ष सक्त मजुरी आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकारी पक्षाकडून ७ साक्षीदार तपासण्यात आले. तर सरकारी वकील म्हणून शैलेंद्र हिंगमिरे यांनी काम पाहिले.