महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Karnataka Border Sealed : तणाव वाढला, महाराष्ट्राची सीमा कर्नाटक सरकारकडून सील! सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

कर्नाटकातील बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यानंतर आता दोन्ही राज्यांमध्ये तणाव वाढला आहे. कर्नाटकच्या वाहनांना काळे फासण्यासह तोडफोडीचे प्रकार सुरु झाल्याने, कर्नाटक सरकारने महाराष्ट्राची सीमा सील केली ( Maharashtra Border Sealed By Karnataka government ) आहे. तसेच सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला ( Police Contingent Deployed at Karnataka Border ) आहे.

महाराष्ट्राची सीमा कर्नाटक सरकारकडून सील
महाराष्ट्राची सीमा कर्नाटक सरकारकडून सील

By

Published : Dec 18, 2021, 1:40 PM IST

सांगली - कर्नाटकच्या बंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेचा ( Shivaji Maharaj Statue Defacement ) घटनेनंतर मिरजेत शिवसैनिकांकडून कर्नाटकच्या वाहनांच्या तोडफोडीचा प्रकार घडला आहे. त्यानंतर कर्नाटक सरकारकडून कागवाड येथील कर्नाटक राज्याची बॉर्डर बंद करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातून कर्नाटक आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी एसटी सेवा बंद करण्यात आली आहे.

तणाव वाढला, महाराष्ट्राची सीमा कर्नाटक सरकारकडून सील! सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
कर्नाटक-महाराष्ट्र सीमा बंद !कर्नाटकच्या बंगळुरु येथे घडलेल्या या संतापजनक घटनेचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. मिरज शहरामध्ये शिवसैनिकांच्यावतीने रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शहरातील कन्नड व्यावसायिक आणि कर्नाटकात जाणाऱ्या एसटी आणि खाजगी वाहनांवर दगडफेक ( Stone throwing on Karnataka Vehicles ) करत तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेनंतर कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्र- कर्नाटक सीमा सील करण्यात आली आहे. मिरज तालुक्यातल्या म्हैसाळ येथील कर्नाटक राज्याच्या कागवाड याठिकाणी बॉर्डर सील करण्यात आली आहे. मोठा पोलिस बंदोबस्त कर्नाटक पोलीस प्रशासनाकडून येथे तैनात करण्यात आला आहे. याठिकाणी महाराष्ट्रातील कोणत्याही वाहनधारकांना अत्यावश्यक कामाशिवाय प्रवेश देण्यात येत नाही. तर दुसर्‍या बाजूला कर्नाटकमधून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून कर्नाटककडे जाणारी सर्व एसटी सेवा बंद ( ST Service Stopped ) करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाकडून ही पाऊले उचलण्यात आली आहेत. तर मिरज शहरामध्येही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details