सांगली- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दोनशे पार झाला आहे. सांगलीत गुरुवारी दिवसभरात एकूण दहा कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे, जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 202 झाली आहे. यातील १०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.
सांगलीत कोरोनाचे द्विशतक, दहा नव्या रुग्णांची नोंद - सांगलीतील कोरोना रुग्ण
जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 202 झाली आहे. यातील १०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.
जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरुवारी दुपारपर्यंत सहा रुग्ण आढळून आले होते, तर चारजण कोरोनामुक्त झाले होते. दुपारपर्यंत आढळून आलेले सर्व रुग्ण शिराळा तालुक्यातील मणदूर येथील असून ते मुंबईहून परतलेले होते. गुरुवारी रात्री आणखी चार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये आटपाडी गळवेवाडीतील ६५ वर्षीय वृद्ध, मिरज तालुक्यातील सोनी येथील ३९ वर्षीय पुरुष, शिराळा तालुक्यातल्या मांगलेच्या लादेवाडी येथील ४२ वर्षीय पुरुष आणि रिळे येथील ४१ वर्षीय महिला या चौघांचा समावेश आहे.
आज कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये कडेगाव तालुक्यातील नेर्ली येथील २५ वर्षीय व ५१ वर्षीय महिला आणि जत तालुक्यातील औंढी येथील ६२ वर्षीय पुरुष आणि ३० वर्षीय तरुणाचा समावेश आहे. या सर्वांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन १४ दिवसांसाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यातील 87 रुग्णांवर उपचार सुरु असून यातील ७ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.