केंद्राच्या विरोधात विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली लक्षणिक उपोषण.. - काँग्रेसचे केंद्र सरकारविरोधात आंदोलन
केंद्र सरकारचे कृषी कायदे आणि महागाईच्या निषेधार्थ सांगलीमध्ये काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करत निषेध नोंदवला आहे.

सांगली - केंद्र सरकारचे कृषी कायदे आणि महागाईच्या निषेधार्थ सांगलीमध्ये काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करत निषेध नोंदवला आहे.
केंद्राविरोधात काँग्रेसचे आंदोलन -
केंद्र सरकारच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीमध्ये अद्याप शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र सरकारकडून तिन्ही कायदे रद्द करण्यात आलेले नाहीत, तसेच दुसर्या बाजूला देशात इंधन दरवाढ आणि महागाईने कळस गाठला आहे, असा आरोप करत काँग्रेसच्या वतीने सांगलीमध्ये केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलेल आहे. शहरातील काँग्रेस कमिटीसमोर कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी काँग्रेस आमदार मोहनराव कदम, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, युवक नेते विशाल पाटील, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह काँग्रेस नगरसेवक व पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
हुकूमशाह पध्दतीने कारभार -
यावेळी मंत्री कदम यांनी बोलताना, केंद्रामध्ये बसलेल्या सरकारने हुकूमशाह पध्दतीने कृषी कायदे मंजूर केले आहेत, पण हे कायदे शेतकऱ्यांच्यासाठी घातक व जाचक आहेत. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत, या ठिकाणी शेतकरी शहीद सुद्धा झाली आहेत. पण केंद्र सरकार या कोणत्याच गोष्टींची दखल घेत नाही. त्यामुळे त्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आल्याचा मंत्री कदम यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.